घरCORONA UPDATECoronavirus Vaccination Update: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर!

Coronavirus Vaccination Update: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर!

Subscribe

संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला मोठ्या पातळीवर सुरुवात झाली. सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली. या कोरोना लसीकरणाच्या मोहीमेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी आणि लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र पहिलेच राज्य आहे, जिथे ५० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लस दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ५० लाख १४ हजार ७७४ जणांचे लसीकरण पार पडले आहे. यापैकी ४३ लाख ४२ हजार ६४६ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ६ लाख ७२ हजार १२८ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

- Advertisement -

देशात २४ तासांत २३ लाख ३ हजार ३०५ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये २१ लाख १३ हजार ३२३ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १ लाख ८९ हजार ९८२ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत भारतात ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. यामधील ४ कोटी ४८ लाख ४६ हजार ५३८ जणांनी पहिला डोस घेतला तर ८२ लाख ९९ हजार १७१ जणांनी दुसरा डोस घेतला.

कोरोना लसीकरणातील टॉप ५ राज्य

राज्य              पहिला डोस           दुसरा डोस           एकूण डोस
महाराष्ट्र           ४३,४२,६४६          ६,७२,१२८          ५०,१४,७७४
राजस्थान         ४३,२७,८७४          ६,६६,७००          ४९,९४,५७४
उत्तर प्रदेश       ३८,७८,९५३          ८,७७,८४६          ४७,५६,७९९
गुजरात           ३७,५९,८५४          ६,२१,९६०             ४३,८१,८१४
पश्चिम बंगाल   ३६,६९,०६५           ५,८१,०७५          ४२,५०,६१४

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! पाच महिन्यानंतर आढळले ५० हजारांहून अधिक रुग्ण!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -