Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: डिस्चार्जनंतर शरद पवारांनी कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस

Corona Vaccination: डिस्चार्जनंतर शरद पवारांनी कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्याच दिवशी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला. त्यानंतर ३० मार्चला शरद पवार यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आणि ३ एप्रिलला म्हणजेच तीन दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज दिल्यानंतर आज शरद पवारांनी कोरोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. याबाबतची माहिती शरद पवार यांच्या ट्वीटर अकाउंटवरून देण्यात आली आहे.

आज सकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी पवारांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे आज पवारांची कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. शरद पवार यांच्या ट्वीटमध्ये असे लिहिण्यात आले की, ‘आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार.’ ‘योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन पवारांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

३० मार्चला शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना ३० मार्चला रात्री रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्तनलिकेत खडा अडकल्याने पवारांना पोटदुखीचा त्रास निर्माण झाला. अँटीस्कोपीच्या माध्यमातून हा खडा काढत आला. आता लवकरच  त्यांचे पित्ताशय काढून टाकण्याची दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.


हेही वाचा – Covid-19 Cases in India: कोरोनाने आतापर्यंतचे मोडले सर्व रेकॉर्ड, १.१५ लाख नव्या रुग्णांची नोंद


 

- Advertisement -