घरताज्या घडामोडीCorona Vaccination : १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण ; चार दिवसांत...

Corona Vaccination : १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण ; चार दिवसांत १७,६०० ने वाढ

Subscribe

मुंबई महापालिकेने कोविडपासून बचाव करण्यासाठी १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी फक्त १२४ मुलांनी तर सात दिवसांत ९,०७६ मुलांनी प्रतिसाद दिला. मात्र २५ ते २९ मार्च या कालावधीत तब्बल १७ हजार ६०० मुलांच्या लसीकरणामुळे वाढ झाल्याने अवघ्या ११ दिवसात एकूण २६ हजार ६७६ मुलांचे लसीकरण झाले आहे. यासंदर्भातील माहिती पालिका आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. कोविडची पहिली, दुसरी व तिसरी लाट मुंबईत धडकली. मात्र पालिका आरोग्य खात्याने जीवाचे रान करून या कोविडच्या तिन्ही लाटांवर विविध प्रकारे उपाययोजनांद्वारे नियंत्रण मिळविले. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा वैद्यकीय तज्ज्ञांनी कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला असला आणि कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी नागरिकांनी कोविडबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

मुंबईत १२ ते १४ या वयोगटातील मुलांचे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. लसीकरण मोहीम १६ मार्चपासून सुरू केली आहे. १६ ते २४ मार्च या सात दिवसांच्या कालावधीत ( सुट्टीचे २ दिवस वगळून) ९ हजार ७६ मुलांचे लसीकरण करण्यात आले होते. तर २९ मार्चअखेर पर्यन्त ११ दिवसांच्या कालावधीत एकूण २६ हजार ६७६ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. २५ ते २९ या कालावधीत लसीकरणाअंतर्गत लाभार्थी मुलांच्या संख्येत १७ हजार ६०० ने वाढ झाली.

१६ ते २९ मार्च दरम्यान झालेले लसीकरण

१६ मार्च पहिल्याच दिवशी फक्त १२४ मुलांचे लसीकरण करण्यात आले होते. १७ मार्च रोजी ४२५ मुलांचे, १९ मार्च रोजी १,०३० मुलांचे, २१ मार्च रोजी १,७६४ मुलांचे, २२ मार्च रोजी १,७२६ मुलांचे, २३ मार्च रोजी १,८२१ मुलांचे, २४ मार्च रोजी २,१९७ मुलांचे, २५ मार्च रोजी ६,१६२ मुलांचे, २६ मार्च रोजी ४,२२६ मुलांचे, (२७ मार्च रोजी सुट्टी होती), २८ मार्च रोजी २,९९६ मुलांचे, २९ मार्च रोजी ४,२७६ मुलांचे असे एकूण ११ दिवसांत १७ हजार ६०० मुलांची वाढ होऊन एकूण २६ हजार ६७६ मुलांचे लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Aditya Thackeray on BJP : ज्यांना डोस द्यायचा त्यांना आम्ही देतो, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -