घरCORONA UPDATEकोरोना प्रतिबंध लस बंद होण्याच्या मार्गावर

कोरोना प्रतिबंध लस बंद होण्याच्या मार्गावर

Subscribe

नाशिक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा संसर्ग संपताच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांपैकी अवघे 10 टक्के म्हणजेच साडेपाच लाख व्यक्तींनी बूस्टर डोस घेतला आहे. आता विनंती करुनही लोक बूस्टर डोस घेत नसल्याने लसीकरण बंदच्या मार्गावर आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. अनेक ठिकाणी तर लस मिळत नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातून लस मागवावी लागली होती. त्यामुळे लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढला. जिल्ह्यातील 51 लाख व्यक्तींनी पहिला तर, 45 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस आरोग्य विभागातर्फे दिला जात आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. महिनाभरात अवघ्या 220 ते 250 व्यक्तींनी हा डोस घेतला. आशा कर्मचारी, आरोग्य सेविकांना लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य विभागाने आता त्यांच्याकडे दुसरी जबाबदारी सोपवली आहे.

- Advertisement -
म्हणून कमी झाला प्रतिसाद 

कोरोनाची तीव्रता झपाट्याने कमी झाल्यानंतर लसीकरणाचा वेग मंदावला. मालेगावसारख्या शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने आरोग्य विभागाला लसीकरणाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. कोरोना गेल्याची भावना लोकांमध्ये रुजल्याने हा परिणाम झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -