घरताज्या घडामोडीसीरमसाठी भावनिक क्षण, अदर पुनावाला यांचे ट्विट

सीरमसाठी भावनिक क्षण, अदर पुनावाला यांचे ट्विट

Subscribe

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-१९ कोरोना वॅक्सिन 'कोविशिल्ड'चं वितरण करण्यास सुरुवात केली आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-१९ कोरोना वॅक्सिन ‘कोविशिल्ड’चं वितरण करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील पहिल्या टप्प्यातील सिरमची इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लस देशभरातील विविध राज्यांसाठी रवाना झाली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

- Advertisement -

मागील १० महिन्यांपासू प्रतिक्षा असलेल्या कोरोना लसीकरणची मोहिम देशात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटमधून पहिला टप्प्यातील लस देशातील विविध राज्यात रवाना झाली आहे. आज मंगळवारपासून सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे बॉक्स ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरु होते. सामान्यांना एवढ्यात कोरोनाविरोधी लस मिळणार नसून सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यात ३० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटकडून १ कोटी १० लाख लसींचे वितरण केले जाणार आहे. तर भारत बायोटेककडून ५५ लाख लसीचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – बलात्कार पीडितेची ओळख फेसबुकवर केली सार्वजनिक; भाजप खासदाराचा प्रताप


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -