घरताज्या घडामोडीcorona virus : महाराष्ट्रातील 13 मंत्र्यांसह 25 बडे नेते कोरोनाच्या विळख्यात, 70...

corona virus : महाराष्ट्रातील 13 मंत्र्यांसह 25 बडे नेते कोरोनाच्या विळख्यात, 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. केंद्र सरकारने देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. तर आता १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सांवत आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा पुन्हा एकदा वेगाने प्रसार होत आहे. यावेळी अधिक प्रमाणात राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. याला कारण म्हणजे राजकीय नेत्यांच्या मुलांचे लग्नसोहळे आणि सभा बैठका ठरल्या आहेत. मंत्री आणि आमदार या बैठकांना हजर राहिले होते. राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली तर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

राज्यातील एकूण १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वक्तव्य मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात अधिक प्रमाणात नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळ चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी एकाच दिवशी ५ ते ६ नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

या नेत्यांना कोरोनाची लागण

के सी पाडवी – आदिवासी कल्याण मंत्री
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री
बाळासाहेब थोरात – महसूल मंत्री
यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण मंत्री
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री
समीर मेघे – भाजप आमदार
धीरज देशमुख – काँग्रेस आमदार
राधाकृष्ण विखे पाटिल – आमदार
सुप्रिया सुळे – खासदार
दीपक सावंत – माजी मंत्री
माधुरी मिसाळ – आमदार
चंद्रकांत पाटिल – आमदार
इंद्रनील नाईक – आमदार
हर्षवर्धन पाटिल – माजी मंत्री
सदानंद सुळे
विपिन शर्मा – ठाणे मनपा आयुक्त
एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री
पंकजा मुंडे – भाजप नेत्या

- Advertisement -

हेही वाचा : india lockdown : वाढत्या संसर्गामुळे वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू; जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -