घरताज्या घडामोडीcorona Virus : महाराष्ट्रात कोरोनामुळे २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, २ हजार १४५...

corona Virus : महाराष्ट्रात कोरोनामुळे २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, २ हजार १४५ जणांवर उपचार सुरु

Subscribe

राज्यात कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये एकूण ४८, ६११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६ हजार २०४ अधिकारी आणि ४२ हजार ४०७ जवानांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार घालयाला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही होत आहे. महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police) कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत एकूण २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील १२६ मुंबई पोलीस (Mumbai Police) कर्मचारी होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना निर्बंधांमध्ये पोलीस प्रत्यक्ष रस्त्यावर असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ३७० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे २६५ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तसेच मुंबई पोलीसमधील १२६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्यने पोलिसांना कोरोना संसर्ग होत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ६० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण २१०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीसमध्ये ७४१ कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत.

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये एकूण ४८, ६११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६ हजार २०४ अधिकारी आणि ४२ हजार ४०७ जवानांचा समावेश आहे. तर ४६ अधिकारी आणि ४५८ जवानांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी महाराष्ट्रात ४६ हजार ७२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी २७ टक्के जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक, मनीष दळवी मतदान करणार, नितेश राणेंना दिलासा मिळणार का?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -