घरताज्या घडामोडीCorona Virus: आदित्य ठाकरेंनी सांगितले डबल मास्क वापरण्याचे कारण, जाणून घ्या

Corona Virus: आदित्य ठाकरेंनी सांगितले डबल मास्क वापरण्याचे कारण, जाणून घ्या

Subscribe

डबल मास्क वापरण्याचे दोन प्रकार

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी डबल मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. डबल मास्क कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून आणि प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता कमी आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शक्य असेल त्यांनी डबल मास्क घालावा असे आवाहन केले आहे तसेच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी त्री सुत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून डबल मास्क वापरत आहेत. त्यांना डबल मास्कबाबत प्रश्न विचारण्यात आले यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. “काही दिवसांपूर्वी वरळीत जम्बो सेंटरची पाहणी करत असताना सोशल मीडियावरील फोटो पाहून अनेकांनी मला विचारले की, डबल मास्क कशासाठी? डबल मास्क गरजेचा आहे! मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी डबल मास्क घालावा. घरी राहा, मास्क वापरा, हात स्वच्छ ठेवा! सुरक्षित राहा! असे ट्विट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला आहे परंतु डबल मास्कमुळे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून ९५ टक्के सुरक्षितता मिळते. अमेरिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (सीडीसी)च्या अहवालानुसार डबल मास्क वापरल्यास कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण ९५ टक्के कमी आहे. डबल मास्कच्या दोन लेयरमुळे संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.

- Advertisement -

डबल मास्क वापरण्याचे दोन प्रकार

१) कापडी मास्कसोबत सर्जिकल मास्क वापरा – फक्त कपड्याचा मास्क घालून संरक्षण होणार नाही कारण कापडी मास्क जास्त प्रभावित नाही. परंतु कापडी मास्क जर सर्जिकल मास्कसोबत वापरला तर कोरोनापासून संरक्षण करता येईल. पहिले सर्जिकल मास्क वापरा त्यावर कापडी मास्क घालावा. आहवालानुसार सर्जिकल मास्क तुमच्या तोंडातील ड्रॉपलेट्स प्रसारित होण्यासापूसन थांबवेल तर कापडी मास्क सर्जिकल मास्कला फाटण्यापासून सुरक्षित ठेवेल.

२) सर्जिकल मास्कच्या कडा बांधा – कोरोना संक्रमित होण्यासापूसन वाचायचे असेल तर सर्जिकल मास्कच्या दोन्ही बाजूंच्या दोऱ्यांची मास्कच्या कडा पकडून गाठ मारा, असे केल्यास मास्क चेहऱ्यावर घट्ट बसेल यामुळे कोरोना होण्यापासून थोड्या प्रमाणात संरक्षण मिळेल. यासाठी चांगल्या प्रतिचा मास्क वापरा.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -