घरताज्या घडामोडीCorona Virus : मास्क सक्ती नाही तर मास्क वापरण्यासाठी आवाहन करतोय :...

Corona Virus : मास्क सक्ती नाही तर मास्क वापरण्यासाठी आवाहन करतोय : अजित पवार

Subscribe

आम्ही पण काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणि पर्वा आणखी कोणी दुसरं येईल. अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळते त्यावेळी आम्ही आमचं नशीब समजतो.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिवसाला हजार कोरोनाबाधितांची नोंद होत असून मुंबईत ८०० पर्यंत कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या मास्क सक्ती करण्यात आली नाही परंतु गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केलं आहे. मास्क सक्ती करण्यात आली नाही तर मास्क वापरण्याचे आवाहन करत असल्याचे अजित पवारांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तसेच मास्क वापरण्याचे आवाहनसुद्धा केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आला नाही परंतु मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर अजित पवारांनी पुन्हा कार्यक्रमातून मास्क वापरण्याचे आवाहन केलं आहे.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, मुंबई कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही अजून मास्क सक्ती केली नाही. पंरतु आम्ही आवाहन केलं आहे की, ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे. त्या ठिकाणी मास्क वापरला पाहिजे. रोज त्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या दाट लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये कोरोना वाढत आहे. जास्त वाढल्यानंतर आपल्याला काय किंमत मोजावी लागते याचा जगाने अनुभव घेतला आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.

आम्ही पण काही ताम्रपट घेऊन आलो नाही

आम्ही पण काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणि पर्वा आणखी कोणी दुसरं येईल. अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळते त्यावेळी आम्ही आमचं नशीब समजतो. मलासुद्धा त्यावेळी चांगले वाटेल ज्यावेळी पदावर बसलो होतो त्यावेळी या विद्यापीठाला काहीना काही मदत करु शकलो, यापुढे काही मदत लागली तर सांगा निश्चितपणे मदतीला येऊ असे अजित पवार म्हणाले आहेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा काम करता आली पाहिजेत असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणाविषयी मोठ्या जाहिराती पण झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष, आशिष शेलारांची टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -