मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

uddhav thackeray and tejas thackeray
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर कोरोनाने धडक दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन ड्रायव्हर सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तेजस ठाकरे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तेजस ठाकरे यांच्यासाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून दोन्ही सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तेजस ठाकरेंच्या इतर सुरक्षारक्षकांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.