Corona Virus : किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे आदेश

राज्य सरकारने राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहेत. चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

corona virus Central Archaeological Department Orders ban tourist entry in raigad fort and karnala abhayaranya
Corona Virus : किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे आदेश

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. तसेच पर्यटन स्थळांवरही राज्य सरकारने बंदी आणली आहे. यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडूनही आदेश जारी करत पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ले रायगडावर पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना पुरातत्त्व विभागाने बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणी निर्बंध लागू कऱण्यात आले आहेत. रायगडवर पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर आता पर्यटकांना बंदी असेल. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाने आदेश दिले आहेत. रायगडपाठोपाठ कर्नाळा अभायारण्यसुद्धा पर्यटकांसाठी तुर्तास बंद कऱण्याचे आदेश दिले आहेत. जिथे जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिकडे पर्यटकांना बंदी असेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या २ हजारांवर पोहोचली आहे. अलिबाग, पेण, कर्जतमध्ये मोठ्या संख्यने कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाने किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी घातली आहे.

राज्यात पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे. राज्य सरकारकडून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये दिवसा जमावबंदी आणि रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे पर्यन स्थळांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी राज्य सरकारकडून आवश्यक काळजी घेण्यात येत आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील आदेशापर्यंत बंद

राज्य सरकारने राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहेत. चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. ११ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आले आहे. परंतु ज्या पर्यटकांनी बुकिंग केलं आहे त्यांना सफारी करता येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापानाने सांगितले आहे.


हेही वाचा : ताडोबा व्याघ्र प्रकल्प 11 जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद