Corona Virus : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनच्या तिसऱ्या लाटेचे संकेत येत आहेत. दरम्यान या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनच्या तिसऱ्या लाटेचे संकेत येत आहेत. दरम्यान या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.’माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.’, असे ट्विट करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण

संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना धुमाकुळ घालत आहे.त्यात कोरोनाच्या विळख्यात अनेक राजकीय नेते अडकले आहेत.त्यातच आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.’माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!’, असे ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे.


हेही वाचा : सनदी अधिकारी आणि आयुक्त चहल विश्वासात घेत नाहीत, महापौरांकडून खदखद व्यक्त