घरताज्या घडामोडीCORONA VIRUS: यवतमाळच्या ११ जणांचा पुण्यातील करोनाग्रस्तांसोबत प्रवास

CORONA VIRUS: यवतमाळच्या ११ जणांचा पुण्यातील करोनाग्रस्तांसोबत प्रवास

Subscribe

संबंधीत ११ जणांची वैद्यकीय चाचणी दुपारी होणार आहे.

राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. कालच दुबईहून आलेल्या पुण्यातील कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या कुटुंबासोबत यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चक्रे गतीमान झाली आहेत. यवतमाळच्या ११ जणांना घरातून बाहेर न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संबंधीत ११ जणांची वैद्यकीय चाचणी दुपारी होणार आहे.

यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील ११ जण २४ फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. दुबईहून तो १ मार्चला भारतात परत आले. दरम्यान, यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या पुण्यातील कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांच्याबाबतीत संशय व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -