करोना….मास्कमुळे निरोगी माणसे घातक आजाराचे शिकार

राज्यात एकही करोना रुग्ण नाही, मात्र , सावधान ! श्वसनातून बाहेर पडलेले जंतू तीन तास अडकून राहिल्याने शरीरासाठी धोकादाय ! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कोकण आयुक्तांचे आवाहन

corona virus district commisioner 45 crore distributed
करोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटींचा निधी

करोनाच्या भितीने अनेक नागरिकांनी मास्क वापरण्यास केलेली सुरुवात म्हणजे स्वताच्या निरोगी शरीराला आजारांच्या खाईत लोटल्यासारखे आहे. डॉक्टर मास्कचा वापर फक्त शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्धा ते एक तासांकरीता करतात. मात्र, करोनापासून सावधगिरी बाळगणारे नागरिक एकच मास्क लावून दिवसभर लावून फिरतात. मास्क जर तीन तासांपेक्षा जास्त वेळ तोंडावर ठेवला तर त्यामध्ये अडकलेले जिवाणू हे आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून निरोगी माणसेही आजारी पडू लागले आहेत. त्यामुळे मास्कचा वापर करु नका आणि भुलथापांना बळी पडून गरज नसलेल्या औषधांचा साठा घरात करण्याचे टाळा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी आज नागरिकांना केले.


हेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये करोना व्हायरसची दहशत; बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी

कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे याची माहिती देण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्तालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवाजीराव दौंड म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि कोकणातील नऊ बंदरांवर परदेशातून आलेल्या सुमारे ७० हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ताप, सर्दी आणि खोकला झालेल्या १६७ प्रवाशांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांचे वैद्यकीय अहवाल करोना निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाच्या नावाने सध्या अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. मास्कबाबतही तेच घडले आहे. त्यामुळे सध्या मास्काचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला आहे. काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत, अशी दौंड यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी आरोग्य विभगाच्या उपसंचालिका गौरी राठोड, वैद्यकीय अधिकारी गणेश धुमाळ, उपायुक्त मनोज रानडे, महिती उपमहासंचालक गणेश मुळे आदी उपस्थित होते.


हेही वाचा – ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचा मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध

करोनाच्या एका रुग्णापासून ८० टक्के लोकांना संसर्ग होतो, मात्र त्यापैकी फक्त पाच टक्के लोकांमध्येच हा आजार बळवतो आणि त्यामध्ये मृत्युचे प्रमाण हे फक्त दोन टक्के आहे.
एन-९५ हा मास्क फक्त डॉक्टर रुग्णावर उपचार आणि शस्त्रक्रिया करताना वापरतात. हा मास्क लावून फिरल्याने नागरिकांमध्ये विनाकारण भिती निर्माण होत आहे.

नियंत्रण कक्ष स्थापन करणार

राज्य सरकारने करोनासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्याचा दुरध्वनी क्रमांक ०२०२६१२७३९४ असा आहे. प्रत्येक शासकीय आणि महापालिकांच्या रुग्णालयात करोनासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सुचना संबंधित प्राधिकरणांना देण्यात आल्या आहेत. कोकण विभागीय आयुक्तालयातही कोरोनासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहितीही शिवाजीराव दौंड यांनी यावेळी दिली.