घरताज्या घडामोडीCoronavirus: पुण्यात अघोषित संचारबंदी; परप्रांतीयांची गावाकडे धाव

Coronavirus: पुण्यात अघोषित संचारबंदी; परप्रांतीयांची गावाकडे धाव

Subscribe

करोनाच्या भीतीमुळे परप्रांतीय लोकांनी आपआपल्या गावी जाण्यासाठी सकाळपासून पुणे स्टेशनवर गर्दी केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महानगरे बंद करण्याची घोषणा केली. फक्त जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये मध्यरात्रीपासून बंद करण्यता येणार आहेत. दरम्यान, करोनाच्या धास्तीने पुण्यात सर्व दुकाने आजपासूनच बंद करण्यात आली आहेत. पुण्यातील सर्व रस्ते ओस पडले आहेत. मात्र, असे असताना पुण्याच्या रेल्वे स्थानकावर मात्र लोकांची तोबा गर्दी आहे.

करोनाच्या भीतीमुळे परप्रांतीय लोकांनी आपआपल्या गावी जाण्यासाठी सकाळपासून पुणे स्टेशनवर गर्दी केली आहे. तिकीटांसाठी भलामोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे तीन फुटाचे अंतर ठेवायला सांगितले असताना एक सेमीचे देखील अंतर ठेवायला जागा नसल्याचे पुणे स्टेशनवर आढळून आले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईला करोनामुक्त ठेवण्यासाठी राबतेय डॉक्टर-कर्मचाऱ्यांची भली मोठी टीम!


पुण्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचे एकूण २१ रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुण्यात सर्वत्र शुकशुकाट आहे. पुण्याच्या लोकांनी स्वत:ला लॉकडाऊन करुन घेतले आहे. पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाल्यामुळे पुण्याबाहेरील लोक स्वत:च्या गावी जायला निघाले आहेत. यामुळे पुण्याच्या स्टेशनवर खचाखच गर्दी झाली आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी टाळण्याचे शासनाचे आवाहन स्टेशनवर जमलेले लोक पूर्णपणे विसरले असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -