घरट्रेंडिंगकरोनामुळे ५०० 'मेड इन चायना' गोष्टींचा भारतात तुटवडा

करोनामुळे ५०० ‘मेड इन चायना’ गोष्टींचा भारतात तुटवडा

Subscribe

मांस, तांदुळ, औषधे निर्यातीवर मोठी बंधने आली आहेत

फार्मा सेक्टरसोबतच सोलार, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी कच्च्या मालाचा तुटवडाही सध्या भारतातील अनेक क्षेत्रांना भेडसावत आहे. ग्लोबल सप्लाय चेनमधील ५०० उत्पादनांची यादी भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने तयार केली आहे. चीनकडून येणाऱ्या या गोष्टींचा पण या सगळ्या सप्लाय चैनमध्ये कोणतीही विषाणुची लागण झाल्याचा प्रकार समोर आलेला नाही. आयात निर्यातीमध्ये अनेक बंधने आल्यानेच संपुर्ण व्यापारावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आमच्या आहेत त्याच ऑर्डर रखडल्या, नव्या ऑर्डरही येत नाहीत. मिडल ईस्टमधून मागणी कमी झालेय, तर इजिप्तमधून थोडीफार मागणी आहे. व्हिएतनाम येते जाणाऱ्या सगळ्या ऑर्डर चीनमधून जात असल्याने त्यांनाही वेळ लागत आहे. केंद्र सरकारने एतुण २६ एक्टीव्ह फार्मासिटीकल इनग्रेडिएंट्स आणि फॉर्म्युलेशन एक्स्पोर्ट करण्यासाठी मज्जाव केला आहे. त्यामध्ये पॅरॅसिटीमोल, विटॅमिन बी १, बी ६, बी १२ यासाऱख्या फार्मासिटीकल्सचा समावेश आहे.

जगभरात मांस निर्यातीमध्ये घसरण, जगभरात तांदळाची कमी होत चाललेली मागणी, औषधावर निर्यातीवर आलेल्या मर्यादा, औषध निर्माण, सोलार आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कच्च्या मालाची टंचाई यासारख्या समस्यांचा फटका सध्या जगभरातील व्यापार क्षेत्रांना बसलेला आहे. करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे या सगळ्या क्षेत्राला फटका बसला आहे.

- Advertisement -

करोनामुळे व्यापार क्षेत्रात झालेली घसरण ही वाणिज्य मंत्री पियूष गोएल यांच्या एक्स्पोर्ट प्रमोशन काऊंसिल आणि इंडस्ट्री चेंबर्स एण्ड असोसिएशनच्या बैठकीत येणे अपेक्षित आहे. जागतिक पातळीवर सप्लाय चेनवर करोनाचा परिणाम झाल्याने भारतावर झालेला परिणाम या बैठकीत चर्चेसाठी येणे अपेक्षित आहे. सर्वात फटका हा मांस निर्यातीच्या क्षेत्राला बसेला असून जगभरात मांस निर्यातीमध्ये १२ ते १५ टक्के घसरण झाल्याचे आढळले आहे. तसेच बासमती तांदळाव्यतिरिक्त ऑर्डरदेखील कमी झाल्या आहेत. जगभरात करोना व्हायरसच्या परिणामामुळे सर्वत्रच कंटेनर वाहतुकीवर बंदी आणण्यात आली आहे. कापड, जेम्स एण्ड ज्वेलरी यासारख्या गोष्टींवरही मोठा परिणाम झाला आहे. तसेच फार्मा सेक्टरवरही याचा परिणाम झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -