घरCORONA UPDATECorona Live Update : कल्याण रिलायन्‍स मार्ट मधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह 

Corona Live Update : कल्याण रिलायन्‍स मार्ट मधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह 

Subscribe

पश्चिमेतील रिलायन्‍स मार्ट येथे काम करणारा एक व्यक्ती १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्‍ह आढळून आलेला आहे. त्‍यामुळे कोरोना साथीच्‍या प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्‍यानच्‍या कालावधीत तेथे काम करणारे सर्व कर्मचारी आणि नागरिक यांनी स्‍वतःला होम क्‍वारंटाईन करुन घ्‍यावयाचे आहे. तसेच सर्दी, ताप, घसादुखी, खोकला, श्‍वसनास त्रास इत्‍यादी लक्षणे आढळल्‍यास नजिकच्‍या महापालिकेच्‍या तापाच्‍या दवाखान्‍यात अथवा महापालिका रुग्‍णालयात जाऊन तपासणी करून घ्‍यावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्‍यात येत आहे.


पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या ५ हजार २१८ झाली आहे. तर १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४ हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


बेलासीस नागपाडा येथील रिपोन हॉटेला आज सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या हॉटेलमध्ये कोरोना संशयित रुग्णांना ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली असून या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- Advertisement -


राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,’सीएसआर’ निधी जमा करता येणार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता शासनाने “महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ” या नावाने स्वतंत्र बैंक खाते उघडले असून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

खात्याचे नाव :- महाराष्ट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी

बँक खाते क्रमांक :- 39265578866

बँकेचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई .

ब्रँच कोड :- 572

आयएफएससी (IFSC) :- SBIN0000572

एमआयसीआर (MICR):- 400002087


मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवसस्थानावर कोरोनाचा शिरकाव झाला असून महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर कोरोनाबाधित महिला अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेले ६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.


घरोघरी वर्तमान पत्रे वाटपास अखेर सरकारची मान्यता असली तरी देखील मुंबई आणि पुण्यात मात्र, घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्य सरकारने आधीच्या वृत्तपत्र वितरण आदेशात बदल केला आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआर) व पुणे महानगर प्रादेशिक विभाग वगळून इतरत्र राज्यभरात काही अटींवर घरोघरी वृत्तपत्रे आता वितरीत होतील. राज्य सरकारने वृत्तपत्र छापाईला परवानगी देताना वितरणावर मात्र बंदी घातली होती. या निर्णयाला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघासोबतच राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांनी विरोध करीत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाने पत्रकारांच्या सांघिक शक्तीचा विजय झाला आहे.


मुंबई महानगर आणि पुण्यातील शिथीलता मागे


भिवंडीत कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह

राज्यासह भिवंडीतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात आता ५ तर ग्रामीण भागात ३ असे भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या एकूण ८ वर पोहचली आहे.

शहरातील वेताळपाडा येथे ५३ वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आला होता. या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णास उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती मिळत असून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भिवंडी क्वॉरंटाइन केंद्रात पाठविण्यात आले होते. वेताळपाडा परिसर देखील मनपा प्रशासनाने सील केला होता. दरम्यान, आता या मालेगावहून आलेल्या व्यक्तीच्या घरातील त्याची ४५ वर्षीय पत्नी आणि त्याची २३ वर्षीय सून अशा दोघी महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाने दिली आहे.


पालघरमध्ये जे घडलं, त्यावर कारवाई करत अटक करण्यात आल्या आहेत. प्रकार घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी आरोपींना अटक केली. जे घडलं, ते घडायला नको होतं. पण असा गैरसमजातून घडलेल्या प्रकारातून लगेचच राज्यभरातली परिस्थिती गंभीर झाली असं म्हणत राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. कोरोनाला एकत्रपणे तोंड देण्याची आवश्यकता आहे. असं प्रकरण घडायला नकोच होतं. – शरद पवार


२१ एप्रिलला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातल्या प्रशासकांची पहिली बॅच बाहेर काढल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही या देशाची स्टील फ्रेम ऑफ इंडिया व्हाल, असं मला वाटतं. – शरद पवार


डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी या लोकांच्या बाबतीत आपण एक आत्मीयता दाखवायला हवी. आपल्या वागण्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या कुटुंबियांना भिती वाटणार नाही, दिलासा वाटेल असं आपण वागायला हवं. – शरद पवार


आपण काळजी घेतली, तर राज्य सरकार हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी शिथिलता देण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम करता येईल. शेतीची कामं करता येतील. सरकारने परवानगी दिल्यानुसार कारखाने सुरू करता येतील. उद्योग-व्यवसाय सुरू होतील. हे झालं तर अर्थव्यवस्था सावरण्याचं मोठं आव्हान आपण पार करू शकतो. आपण संकटाच्या बाबतीत नकारात्मक विचार करू नये. आपण त्याचा सामना करणार आहोत आणि यशस्वी होणार आहोत असा विचार आपण करायला हवा. – शरद पवार


राष्ट्रपती भवनात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हा संसर्ग आहे. दोन व्यक्तींमध्ये ठेवायच्या अंतराचा नियम आपण पाळत नाही. त्यामुळे जिथे कोरोना नव्हता, अशा ठिकाणी देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे – शरद पवार


सरकारी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कठोरपणे करून मृतांचा आकडा शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण ठरवलं, तर आपण ते करू शकतो. महाराष्ट्राचं ते वैशिष्ट्य आहे. – शरद पवार


अमेरिकेसारखा जगातला धनिक देश आणि सर्वच बाबतीत सुस्थितीत असलेला देश देखील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ४० हजार ७८३ आहे. इटलीसारख्या देशात २३ हजार ६०० लोक, चीनमध्ये २३ हजार ८५२, फ्रान्समध्ये १९ हजार ७५२ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या देशांची लोकसंख्या तुलनात्मकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमी आहे. पण तरी तिथली परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात कालपर्यंत मृतांचा आकडा ५९० आहे. तर महाराष्ट्रात २२३ मृत्यू झाले आहेत – शरद पवार


लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करण्याची स्थिती निर्माण होऊ द्यायची नाही, ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारायला हवी – शरद पवार


डॉक्टर्स आणि नर्सेसवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि हे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करण्यासाठी आता आयएमएने केंद्र सरकारला इशारा दिला आहे. २२ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्व डॉक्टर्स आणि हॉस्पिटल मेणबत्त्या लावून निषेध करणार आहेत.


देशभरात कोरोनाचा वाढता फैलाव पाहाता आता केंद्र सरकारने यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. त्यानुसार देशभरातल्या विविध भागात असणाऱ्या रेड झोनमध्ये ही पथकं आज प्रत्यक्ष भेट देणार असून त्याचे अहवाल केंद्र सरकारला सादर केले जाणार आहेत. तसेच, तिथल्या परिस्थितीनुसार राज्य सरकारांना योग्य ते निर्देशही दिले जाणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात ही पथकं आज भेटी देणार आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं सातत्याने या ठिकाणी उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे.


जगभरात आत्तापर्यंत कोरोनाचे २४ लाख ८१ हजार रुगण झाले असून १ लाख ७० हजार बळी झाले आहेत. एकट्या अमेरिकेत गेल्या २४ तासांत १ हजार ९३९ मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -