घरताज्या घडामोडीCoronavirus: वैद्यकीय व्यावसायिकांची‌ ओपीडी बंद

Coronavirus: वैद्यकीय व्यावसायिकांची‌ ओपीडी बंद

Subscribe

ओपीडी बंद न ठेवण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन

राज्यात करोना संसर्गाचा कहर आता जाणवू लागला आहे. याचे दुष्परिणाम पाहून अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याच्या तक्रारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे, वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवू नयेत असे आवाहन आरोग्य‌ विभागाकडून‌ करण्यात येत आहे.


हेही वाचा – Coronavirus: जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांच्या रांगा, आता या गर्दीच करायचं काय?

- Advertisement -

वैद्यकीय व्यावसायिकांच्या ओपीडीच बंद ठेवल्यास इतर रुग्णांच्या रुग्णसेवेचं काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अशा काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत, असे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.

सार्वजनिक रुग्णालयांमध्येही ज्येष्ठ नागरिकांनी कम्युनिटी संसर्ग होईल म्हणून आवश्यक असल्यास सार्वजनिक रुग्णालयात यावे. अन्यथा छोट्या मोठ्या आजारासाठी जवळच्या सरकारी दवाखान्यांतून उपचार करावेत अशा सुचना देण्यात आल्या‌ होत्या. पण, करोना पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये
फिवर ओपीडी सुरु करण्यात आली आहे. ही फिवर ओपीडी २४ तास खुली राहील, असेही नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -