घरCORONA UPDATECoronavirus : कोरोना व्हायरस लसीचा प्राण्यांवर प्रयोग सुरू

Coronavirus : कोरोना व्हायरस लसीचा प्राण्यांवर प्रयोग सुरू

Subscribe

गुजरात मधील जायडस कॅन्डीला कंपनीने ही लस तयार केली आहे. याच कंपनीने २०१० मध्ये देशात आलेल्या स्वाईनफ्लूची लस शोधली होती.

जगात कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. परंतु, त्यात अद्यापही कोणाला यश आलेले नाही. मात्र, आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशात कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यात आली आहे. सध्या या लसीचे प्राण्यांवर प्रयोग सुरू आहेत. याचा निकाल येण्यासाठी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. गुजरात मधील जायडस कॅन्डीला कंपनीने ही लस तयार केली आहे. याच कंपनीने २०१० मध्ये देशात आलेल्या स्वाईनफ्लूची लस शोधली होती.

मार्च महिन्यापासून लसीवर काम सुरू

मार्चमध्ये कंपनीने सूचना दिली होती की, आम्ही कोरोना व्हायरसवर लस शोधत आहोत. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शर्वील पटेल यांनी सांगितले की, आम्ही कोरोना व्हायरसच्या लसवर काम करत आहोत. लसची प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. परंतु, यात आम्हाला यश मिळेल, अशी आशा आहे.

- Advertisement -

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन उत्पादनात दोन कंपन्यांची भागीदारी

मलेरिया आजारावर गुणकारी असलेले औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे उत्पादन भारतात इप्का लैबोरेटरीज आणि जायडस कॅन्डीला या कंपन्या करतात. फार्मा सेक्टर यांच्या माहिती नुसार, भारतात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या उत्पादनात या दोन्ही कंपन्यांची ८० टक्के भागीदारी आहे.

भारतीय कंपन्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे उत्पादन वाढवणार

सरकारने औषध कंपन्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे उत्पादन आणि विक्री वाढविण्यासाठी सांगितले आहे. सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे १० करोड टॅबलेट बनविण्याचे ऑर्डर जायडस आणि इप्का लॅबोरेटरीज या कंपन्यांना दिले आहे. इतक्या टॅबलेट ५० ते ६० लाख कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी आहेत. ही औषध अमेरिकेसह इतर देशांमध्ये पाठवली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -