घरताज्या घडामोडीMhada Lottery 2021 : कोरोना योद्ध्याने वनरूम किचनमध्ये दिवस काढले, म्हाडामुळे घराचे...

Mhada Lottery 2021 : कोरोना योद्ध्याने वनरूम किचनमध्ये दिवस काढले, म्हाडामुळे घराचे स्वप्न पुर्ण

Subscribe

कोरोनाच्या महामारीच्या मी कोविड योद्धा असल्याने मला वन रूम किचनमध्ये घरच्यांसोबत एकत्र राहण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेकदा खुद्द मुलानेही मला आरोग्यसेवा देताना वेगळ्या रूममध्ये राहण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते. पण कोरोनाच्या महामारीत आयसोलेट करणे शक्य झाले नाही. भाड्याच्या वनरूम किचनच्या घरातच सगळे महामारीतले आणि कोरोनाच्या संसर्गातले दिवस काढले. तेव्हाच मनात घर घेण्याचे निश्चित केले होते. अखेर म्हाडाच्या घराच्या लॉटरीची घोषणा होताच या सोडतीसाठी मी अर्ज केला. माझ्या मुलाने माझ्या कामाचे स्वरूप पाहता पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात आले, असे सांगताना कोविड योद्धा रूपाली संदेश पारटे यांना अश्रू अनावर झाले. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये त्यांचे पती संदेश पारटे यांना घणसोली येथे लॉटरीतील घर मिळवण्यात यश मिळवले आहे. हा सगळा आनंद व्यक्त करताना रूपाली पारटे अतिशय भावूक झाल्या होत्या. ()

कोरोनाच्या महामारीच्या संकटात रूग्णसेवा तर करायची होती. पण या सेवेनंतर घरी परतल्यावर वनरूम किचनमध्ये खूपच कोंडी व्हायची. घरात छोटा मुलगा होता. पण नाईलाजाने एकत्रच रहावे लागत होते. त्यामुळेच मुलानेही मला वन बीएचके रूम घेऊयात म्हणजे आयसोलेट होणे सोपे होईल असे सुचवले होते. मी बेडरूममध्ये राहीन, तु हॉलमध्ये थांब असाही पर्याय आम्ही विचार केला होता या वन बीएचके फ्लॅटच्या निमित्ताने. याच विचाराने कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये मी अर्ज केला. आम्ही केलेला विचार आणि घरासाटीचे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात अवतरले आहे. घर मिळाल्याने खूपच आनंद झाला आहे. त्यामुळे रूग्णसेवा देताना माझे कुटूंब सुरक्षित राहील ही भावना आता मनात असल्याचे रूपाली यांनी सांगितले. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या सोडतीच्या दरम्यान काशिनाथ घाणेकर येथे झालेल्या लॉटरीत त्यांनी स्वतः उपस्थित राहून सोडत जिंकल्यासाठी म्हाडाचे आभार मानले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -