घरक्रीडाकरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकला, महाराष्ट्र सरकारची भूमिका

करोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकला, महाराष्ट्र सरकारची भूमिका

Subscribe

करोनामुळे आयपीएलवर संकट ओढवले. आयपीएलचे सामने पुढे ढकलावेत, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोनासंदर्भात राज्यमंत्र्यांची आज बैठक बोलावली असून करोनाचा सर्वात मोठा फटका भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ‘इंडियन प्रीमियर लीग’ला (आयपीएल) बसू शकतो. नुकतीच करोनावर राज्य सरकारची आढावा बैठक संपली असून यामध्ये आयपीएलचे सामने पुढे ढकलावेत, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. आता महाराष्ट्रामध्ये करोना रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यामुळे होऊ घातलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुढे जाऊ शकते किंवा रद्दही होवू शकते. दरम्यान, कर्नाटक सरकारने कर्नाटकमध्ये आयपीएलचे सामने घेऊ नये, असे सांगितले आहे. करोना व्हायरसमुळे जगभरातील मोठ-मोठे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आता करोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसण्याची शक्यता आहे. कर्नाटकात गर्दी टाळण्यासाठी कर्नाटक सरकारने आयपीएलच्या सामन्यांस नकार दिला आहे.

चौकार आणि षटकारांच्या आतीषबाजीचे एकमेव ठिकाण म्हणजेच आयपीएल. हीच चौकार आणि षटकारांची आतीषबाजी करोनामुळे धोक्यात आली आहे. आयपीएलला पहिला झटका कर्नाटक सरकारकडून बसला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू (आरसीबी)ला धक्का बसला आहे. आरसीबीच्या मॅचेस बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळले जातात. परंतु कर्नाटक व तामिळनाडूकडून आयपीएलसाठी असमर्थता दर्शविण्यात आली आहे. आता महाराष्ट्र सरकार आयपीएल संदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या राज्यमत्र्यांच्या करोनासंदर्भातील बैठकामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहीले होते. आयपीएल रद्द होवू शकते, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले होते.

- Advertisement -

२९ मार्चपासून पहिली लढत सुरू

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने आयोजित करायचे की नाहीत याबाबत सरकारनं आज आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सरकारनं सावध भूमिका घेतल्याचं कळतंय. आयपीएल सामने पाहण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून आयपीएल सामन्यांच्या तिकिटांची विक्री करू नये, अशी भूमिका राज्य सरकार घेणार असल्याचं कळतंय. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होत असून मुंबई आणि चेन्नई यांच्यात वानखेडे स्टेडियमवर पहिली लढत होणार आहे.

आयपीएल रद्द झाल्यावर अर्थकारणावर संकट

आयपीएल सामने आयोजित करावेत, मात्र गर्दी टाळण्यासाठी तिकीट विक्री करू नये अशी सरकारची भूमिका आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार ही भूमिका घेण्याची शक्यता असून याबाबत सरकारकडून विधिमंडळात निवेदन केलं जाण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण अवलंबून असल्यानं स्पर्धा रद्द केल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो. स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाऊ शकतात. त्याचं टीव्ही चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होत असल्यानं प्रेक्षक घरी बसून सामने पाहू शकतात. त्यामुळे गर्दी टाळण्याचा तोडगा काढून ही स्पर्धा खेळवण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं.

- Advertisement -

राज्यमंत्र्यांच्या बैठकीत हेही मुद्दे मांडण्यात आले

* शाळा महाविद्यालयांच्या संदर्भात राज्य सरकार आठदिवसाचा अवधी घेणार
* एअरपोर्ट स्क्रीनिंग वाढवण्याचा प्रयत्न करणार
* केंद्र सरकारकडून लेब्रोटरी वाढवण्याकरिता राज्य सरकार मागणी करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -