घरमहाराष्ट्रकोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील, मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आवाहन

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील, मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आवाहन

Subscribe

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन, लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकच्या दिशेने चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिसीद्वारे उद्योग समूहाच्या प्रमुखांशी, चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुखांशी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना फोन करुन राज्यात परिस्थिती गंभीर असून कडक निर्बंध लागू करावे लागतील यामुळे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. जनता कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी आणि विरोधी पक्षनेत्यांशी फोनवर चर्चा करत कडक निर्बंध तसेच लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन राज्यातील परिस्थिती गंभीर असून कडक निर्बंध लावावे लागतील, विरोधीपक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करावे असे आवाहन केले यावर फडणवीसांनी म्हटले की “आवश्यक त्या उपाययोजनांसाठी आम्ही सहकार्य करु. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या पाठीशी नक्कीच उभी राहील असे अश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं असे ट्विट करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -