घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटनिफाड तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोनाचा पहिला बळी

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोनाचा पहिला बळी

Subscribe

शिरसगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

ओझर : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन  झाले असून निफाड तालुक्यातील हा पहिला बळी आहे.यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा ५ जून रोजी कोरोना ची लक्षणे आढळून आली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्याच्या घशातील  स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल दिनांक ६ जून रोजी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.  दि. ८ रोजी
सकाळी या रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली आणि दुपारी त्याचे निधन झाले. हा रुग्ण  पोस्टमन असल्याची माहिती समजते. ही बातमी जनसामान्यांत समजताच शिरसगावसह निफाड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान पिंपळगाव बसवंत येथेही एक तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने निफाड तालुक्यातील जनतेच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -