Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोरोनाचा बंदोबस्त, गल्लीबोळ, शौचालयात महापालिकेची सॕनिटायजेशन मोहीम

कोरोनाचा बंदोबस्त, गल्लीबोळ, शौचालयात महापालिकेची सॕनिटायजेशन मोहीम

सार्वजनिक शौचालयात नियमितपणे सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होत असल्याचे सचिन पडवळ यांनी सांगितले.

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी दररोज ७ हजारांपेक्षाही जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई शहर व उपनगरात गल्लीबोळात, सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे.त्यामुळे झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास आणि रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांची ८ मे २०२० रोजी बदली झाल्यानंतर इकबाल चहल यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी मुंबईत धारावी, वरळी व अन्य ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट होते. आयुक्त चहल यांनी, दुसऱ्याच दिवशी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी झोपडपट्टीत भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी धारावीमधील कोरोना प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या सार्वजनिक शौचालयात दररोज सॅनिटायझर फवारणी करण्याचे व स्वच्छता राखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईतील ६०% झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयात सॅनिटायझरची फवारणी करण्याचे अभियान गेले काही महिने सुरू होते. अगदी जानेवारी २०२१ मध्ये कोरोना नियंत्रणात येण्यास बऱ्यापैकी हातभार लागला.
त्यानुसार, आता पुन्हा एकदा झोपडपट्टी विभागात स्थानिक नगरसेवकांनी गल्लीबोळात, सार्वजनिक शौचालयात नियमितपणे सॅनिटायझर फवारणी करण्याचे अभियान सुरू केले आहे.शिवडी येथील शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सार्वजनिक शौचालयात पुन्हा एकदा सॅनिटायझर फवारणी करणे सुरू केले आहे. एप्रिल महिन्याच्या आरंभापासून नगरसेवक पडवळ यांनी त्यांच्या विभागातील शिवडी कोळीवाडा, गणेशनगर, गोपाळनगर, शिवडी बीडीडी चाळ आदी ठिकाणच्या ७० -८० (७६२ शौचकूप) सार्वजनिक शौचालयात नियमितपणे सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होत असल्याचे सचिन पडवळ यांनी सांगितले.पालिकेच्या सहकार्याने व सामाजिक संस्थांमार्फत आपल्या विभागात सर्वत्र सार्वजनिक शौचालयांत सॅनिटायझर फवारणी करण्यात येते. या कामात पारदर्शकता ठेवण्यासाठी शौचालयांत सॅनिटायझरची फवारणी केल्यानंतर तेथील रहिवाशांची एका रजिस्टरवर सही घेण्यात येते. त्यामुळे या सॅनिटायझर फवारणी अभियानात पारदर्शकता राखली जात असल्याचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.
अशाच प्रकारे वरळी येथील शिवसेना नगरसेवक दत्ता नरवनकर यांनीही त्यांच्या विभागातील रस्ते, चाळी, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या प्रकारे मुंबईत सर्व २२७ ठिकाणी गतवर्षीप्रमाणे या वर्षीही सार्वजनिक शौचालयात सॅनिटायझरची फवारणी बंधनकारक केल्यास अथवा नियमित फवारणी झाल्यास मुंबईत विशेषतः झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.


हे हि वाचा – दया कुछ तो गडबड है…, सीबीआयच्या कारवाईवर संजय राऊतांनी उठवलं शंकेचं मोहोळ

- Advertisement -