घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये नव्या ११४ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार २६४

औरंगाबादमध्ये नव्या ११४ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार २६४

Subscribe

औरंगाबादमध्ये ११४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार २६४ झाली आहे.

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज औरंगाबादमध्ये ११४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार २६४ झाली आहे. तर यापैकी १ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर ११६ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ८६५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आज, बुधावारी प्रशासनाने दिली आहे.

३९ महिला तर ७५ पुरुषांचा समावेश

औरंगाबादमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये ३९ महिलांचा तर ७५ पुरुषांचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण कैलास नगर (२), कटकट गेट (१), संसार नगर (१), बारी कॉलनी (२),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (१), औरंगपुरा (१),सिडको एन सात (२),अरिहंत नगर (१), न्याय नगर, गारखेडा (१), संजय नगर, बायजीपुरा (१), शांतीनिकेतन कॉलनी (१), गजानन नगर, गारखेडा (१), भानुदास नगर (१), गारखेडा परिसर (५), सारंग सोसायटी (२), सहयोग नगर (२),सिटी चौक (१), खोकडपुरा (१), फाहेत नगर, राहत कॉर्नर (३), हर्ष नगर (२), बाबर कॉलनी (१), टिळक नगर (२), शहा बाजार (१), पडेगाव (३), शिवाजी नगर (१), बेगमपुरा (२), बजाज नगर,सिडको (१), जुना बाजार (१), मुलमची बाजार,सिटी चौक (२), मयूर नगर, एन अकरा (३), एन आठ (२), आकाशवाणी परिसर (१), मसोबा नगर (१), एन अकरा (१), एन चार,सिडको (१), विशाल नगर (१), आदिनाथ नगर, गारखेडा (२), जाधववाडी (१), टी. व्ही. सेंटर (१), आरटीओ ऑफिस परिसर (१),चित्रेश्वर नगर (१), बीड बायपास (१), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (२), रोकडिया हनुमान परिसर (१), मस्के पेट्रोलपंपाजवळ (१), प्रताप नगर,सिडको (१), एन सहा, साई नगर,सिडको (१), बंजारा कॉलनी (१), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (१), ज्योती नगर, दर्गा रोड (१), इंदिरा नगर, बायजीपुरा (१), सावरखेडा, ता. सोयगाव (२), कन्नड (१), सिता नगर, बजाज नगर (५), बजाज नगर परिसर (११), सिडको वाळूज महानगर एक (२), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), गणेश नगर, पंढरपूर (२), अन्य (१६) या भागातील कोरानाबाधित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहिण – भावाची हत्या; दीड किलो सोने लंपास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -