घरताज्या घडामोडीराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

Subscribe

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आजही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पुढे असून, ३ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आजही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पुढे असून, ३ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. तसेच, नागपूर येथे बीए ५ व्हेरियंटचे २ रुग्ण आढळून आले आहेत. (coronavirus 4255 new cases today active in maharashtra)

सक्रीय रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे

- Advertisement -

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात ४ हजार २५५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात ४०२४ रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. तसेच, राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. त्याशिवाय, सध्या राज्यात २० हजार ६३४ सक्रिय रुग्ण झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये मुंबईतील ७० टक्के रुग्ण आहेत. मुंबईत सध्या १७ हजार ५ सक्रिय रुग्ण आहेत. त्याशिवाय ठाणे ३९७८ आणि पुणे १४५३ सक्रीय रुग्ण आहेत. या तीन शहरात सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे आहे.

दरम्यान, मागील 24 तासात 2879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या 7755183 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 97.87% एवढे झाले आहे. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २० हजारांच्या पार

- Advertisement -

सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यातील रुग्णांच्या आकडेवारीत सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत आज २३६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय ठाणे मनपा ३७४, नवी मुंबई मनपा ३८३, वसई विरार मनपा १२२, पनवेल मनपा १२७, पुणे मनपा १९४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. इतर ठिकाणी नव्या कोरोना रुग्णांची सख्या १०० च्या आत आहे. नंदूरबार, सांगली मिरज कुपवाड मनपा, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या ठिकाणीही एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही.

बीए. ५ व्हेरियंटचे २ रुग्ण

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथे बीए. ५ व्हेरियंटचे २ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक रुग्ण २९ वर्षीय पुरुष असून दुसरा रुग्ण ५४ वर्षाची महिला आहे. त्यांनी मागील आठवडयात अनुक्रमे केरळ आणि मुंबई येथे प्रवास केला आहे.


हेही वाचा – ‘मनविसे’च्या पुनर्बांधणीला सुरूवात; अमित ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -