घरCORONA UPDATEपुणे महापालिकेच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनची लागण

पुणे महापालिकेच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनची लागण

Subscribe

पुणे महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. बुधवारी मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे महापालिकेच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. अहोरात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण सुरु झाली आणि त्यापाठोपाठ आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण लागण्यास सुरुवात झाली आहे.

४३ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाला अटकाव करण्याकरिता पालिका सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. लढाईमध्ये पालिका प्रशासन पूर्णपणे व्यस्त असतानाही दैनंदिन स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामे चोख पणे पार पडली जात आहेत. ही कामे करणाऱ्या येरवड्यातील सहायक आरोग्य निरीक्षकासह गुलटेकडीतील एक मुकादम, भवानी पेठ आणि धनकवडीतील दोन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भवानी पेठ आणि धनकवडीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच दोन कचरावेचकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांची पालिकेने तपासणी करुन घेतली आहे. मात्र, त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाही. दरम्यान, आरोग्य व्यवस्थित राहावे याकरिता दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असून भीतीचे वातावरण देखील पसरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी मिळणार, वाचा काय आहेत नियम!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -