घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; ९४ नव्या रुग्णांची वाढ

औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; ९४ नव्या रुग्णांची वाढ

Subscribe

औरंगाबादमध्ये ९४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५२४ झाली आहे.

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज औरंगाबादमध्ये ९४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५२४ झाली आहे. तर यापैकी १ हजार ३६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर १२८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता १ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील

औरंगाबादमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये ४६ महिलांचा तर ४८ पुरुषांचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण कटकट गेट (१), समर्थ नगर (२), रोशन गेट (१), संजय नगर (१), संभाजी कॉलनी (१), सिल्क मील कॉलनी (१), सिडको (१), राम नगर (१), पीर बाजार (२), उस्मानपुरा (१), कबीर नगर, सातारा परिसर (२), रोशनगेट (४), औरंगपुरा (५), सादात नगर (२), बायजीपुरा (३), पुंडलिक नगर (६), सिटी चौक (१), जुना बाजार, न्यू वस्ती (२), चेतना नगर (१), शिवाजी नगर (३), बौद्ध नगर, जवाहार कॉलनी (२), सारंग सोसायटी (२), उत्तम नगर (१), महेश नगर (२), गौतम नगर, जालना रोड (१), न्यू हनुमान नगर (१), जुना मोंढा, गवळीपुरा (१), एन आठ सिडको (१), छावणी परिसर (१), सुंदरवाडी (१), गुलमंडी (१), मुजीब कॉलनी, रोशन गेट (१), ‍विशाल नगर (३), पटेल नगर (२), रेणुका माता मंदिर एन नऊ (१), यशोधरा कॉलनी, नेहरु नगर (१), रहीम नगर (१), भवानी नगर (१), साई नगर, एन सहा,सिडको (१), खोकडपुरा (१), संजय नगर, आकाशवाणी परिसर (१), एन तीन सिडको (१), सिडको टॉउन सेंटर, एन वन (१), संत एकनाथ सोसायटी (२), एन चार सिडको (१), बारी कॉलनी (१), रोजा बाग (१), एमजीएम परिसर (१), बजाज नगर (२) आणि निल्लोड ता. सिल्लोड (३), वैजापूर (१), मारीसूरी कॉलनी, गंगापूर (१), गणेश नगर, पंढरपूर (१), पडेगाव (१), कन्नड (२), मुकुंदवाडी (१), खुलताबाद (१), नारेगाव (२), कानडगाव (१), अन्य (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Live Update: देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे रुग्ण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -