‘चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या बाळाला मास्क घालुदे!’

'करोना'बाबत चिऊताईच्या गाण्यातून जनजागृती

Coronavirus awareness is given through poem
चिमणी

२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून मानला जातो. याच जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने करोनाबाबत जनजागृती केली जात आहे. माहुली येथील कवी लेखक सविता माने यांनी चिऊताईचे गाणे करोनाच्या पार्श्वभूमीवर तयार केले आहे.

चिऊताई चिऊताई दार उघड
थांब माझ्या बाळाला मास्क घालुदे!
चिऊताई चिऊताई दार उघड
थांब माझ्या दारावर स्प्रे मारुदे!
चिऊताई माझं म्हणणं आहे एक.
चिमणी दिनाचा कापूया ना केक!
….काऊ दादा शुभेच्छाही दूरूनच दे
“कोरोनाची” माहिती समजून घे !
असेल ना सर्दीखोकला बाहेरूनच बोल
पिंडस्पर्श करताना चोच धुतो का बोल?
अरे! हल्ली माणसं घरात बंद झाली
देवळालाही म्हणे कुलपं लागली..
मुस्क्यातलं जनावर माणसाला हसे
तोंडाला मास्क लावून सेल्फी कसा दिसे?
कसला चिमणी दिन अन् कसलं काय..
चारा खाईन अलगद पण पाण्याच काय?
“जातो बाई चिऊताई” तुला ताप नको
संशयाचा ऊगीच कल्लोळ नको.
पण जाताना सांगतो एक कटू सत्य
मरणाच्याच वाटेवर फिरतो मी नित्य.
महापूर, स्तूनामी अन वाढणारा गुन्हा
कोरोनाच्या नावनं मरण आलय पुन्हा!
ग्रंथांमघून लिहून ठेवले आहे कोणी,
कलयुगात मरण येईल “कोंबड्यांवाणी”
लेकरालाही माय दूरदूर करेल
जिवंतपणीही क्षणोक्षणी मरेल!
पोटापैशापाई लोकं जगभर फिरतील
माघारी येताना लाजूनसुद्धा झुरतील!
माता गेली आश्रमात, बाळ गर्भात मरे
बांधावरचे भांडण कोर्टात शिरे!
गोहत्या करून खिसे भरले गच्च,
सरड्यासम रंग बदलून मानवच ऊच्च!
भिऊ नको चिऊताई सरकार आहे दक्ष
तेहत्तीस कोटी देवांचंही भारतावर लक्ष!
एवढे सारे ऐकून चिमणीला आला धिर
दार उघडायला झाला बाबा ऊशीर!
माफ कर काऊ दादा भिले होते मी
माणसाचे वागणे शिरले होते कानी..
आता मलाही कळलंय स्वार्थ नाही बरा,
भगवंताच्या नामाचा मार्ग आहे खर!


हेही पाहा – जनता कर्फ्यूला राज्यात उत्तम प्रतिसाद…’नाहीतर करोना येईल दारी…’