Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE देशात कोरोनाचा स्फोट; रुग्णसंख्येत 79 टक्क्यांची वाढ; दिल्लीत 2146 नवे रुग्ण

देशात कोरोनाचा स्फोट; रुग्णसंख्येत 79 टक्क्यांची वाढ; दिल्लीत 2146 नवे रुग्ण

Subscribe

त्याचवेळी बुधवारी देशात कोरोना संसर्गाचे 16 हजार नवीन रुग्ण आढळले आणि 54 रुग्णांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली : देशात मागील काही काळापासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान मुंबई, दिल्ली, केरळ या राज्यांत सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. मुंबईत कोरोनाचा वेग समोर आला आहे. मुंबईत एका दिवसात कोरोना संसर्गाचे 852 नवे रुग्ण आढळले आहेत. एका अहवालानुसार,, या प्रकरणांमध्ये 79 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (coronavirus cases in india mumbai reports 852 new covid cases seven fatalities maharashtra)

त्यासोबत दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,146 रुग्ण आढळून आले, तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील संसर्ग दर 17.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी दिल्लीत कोरोनाचे 2495 नवीन रुग्ण आढळले होते. ज्यामुळे संसर्ग दर 15.41 टक्क्यांवरून 17.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांतील एका दिवसातील हा सर्वाधिक मृत्यू आहे. याच्या एक दिवस आधी दिल्लीत सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे तीन दिवसांत कोरोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दिल्लीत जूनपासून आतापर्यंत कोरोनाचे एकूण 68,644 रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत एकूण 61,901 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी या महिन्यात आतापर्यंत 10 दिवसांत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या 10 दिवसांत कोरोनाचे 19,769 रुग्ण आढळले आहेत. सध्या दिल्लीत कोरोनाचे एकूण 8205 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 510 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 138 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. lj कंटेनमेंट झोनची संख्या 259 आहे.

महाराष्ट्राचा विचार केला असता, बुधवारी राज्यात 1,847 आणि मुंबईत 852 कोरोना संसर्गाचे नवे रुग्ण आढळले. यासह राज्यातील बाधितांची संख्या 80,64,336 वर गेली आहे, तर 1,48,157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एक दिवस आधी राज्यात कोरोना संसर्गाचे 1782 रुग्ण आढळले होते. सध्या राज्यात 11,889 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 79 टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याचवेळी बुधवारी देशात कोरोना संसर्गाचे 16 हजार नवीन रुग्ण आढळले आणि 54 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांमध्ये 3,546 ने घट झाली असून त्यांची संख्या 1,28,261 वर आली आहे. दैनंदिन आणि साप्ताहिक संक्रमण दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहेत.

देशातील दैनंदिन संसर्ग दर 4.94 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 4.90 टक्के आहे. रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.52 टक्के झाला असून मृत्यूदर 1.19 टक्के राहिला आहे. कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 207.22 कोटी अँटी-कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 102.26 कोटी प्रथम, 93.66 कोटी द्वितीय आणि 11.28 कोटी बुस्टर डोसचा समावेश आहे.

दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचाही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीही आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे राजस्थान दौरा रद्द केला आहे.


दिलासादायक! महाराष्ट्रातील मंकीपॅाक्सच्या 17 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -