घरताज्या घडामोडीCorona: ३ वर्षाच्या मुलाचा कोरोनाने घेतला बळी; मृत रुग्णांची संख्या ५९१ वर

Corona: ३ वर्षाच्या मुलाचा कोरोनाने घेतला बळी; मृत रुग्णांची संख्या ५९१ वर

Subscribe

औरंगाबादमध्ये एका ३ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना एका ३ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलाचा कोरोनाने बळी घेतला आहे. या मुलासह जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या ५११ झाली आहे.

समता कॉलनी वाळूज येथील ३ वर्षीय मुलाला १४ ऑगस्ट रोजी घाटी रुग्णालयात उपचारा करता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. या मुलासह एन-११, हडको येथील ४९ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला आणि घाटशेंद्रा-कन्नड येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

रुग्णसंख्या १८ हजार ८०१

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळी १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ८०१ एवढी झाली आहे. त्यापैकी १३ हजार ८८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४ हजार ३२५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


हेही वाचा – Pune Corona: पुण्यात गेल्या २४ तासात १०४९ जण ‘कोरोना’मुक्त; ८३५ नवे रूग्ण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -