Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE coronavirus : मुंबई, पुण्यात रुग्णांची संख्या कमी होण्यामागे 'ही' आहेत कारणे

coronavirus : मुंबई, पुण्यात रुग्णांची संख्या कमी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात मार्च २०२१ पासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक ६० हजारांचा पुढे गेला. यात मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काही दिवसांत मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली तर मुंबईतही महानगरपालिकेने पूर्वीप्रमाणे कडक निर्बंध लागू केले. मात्र तरीही रुग्णसंख्या वाढतच होती. मात्र १३ एप्रिल २०२१ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले. 19 एप्रिलपासून मुंबई-पुणे या शहरांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावेळी मुंबईचा विचार केला असता मुंबईची रुग्णसंख्या १६, ५९६ वर पोहचली होती. तर मुंबईत हजाराचा आसपास रुग्ण आढळत होते. मात्र लॉकडाऊनला १० हून अधिक दिवस झाल्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत ५० टक्के घट झाली आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या कमी होण्यामागे नेमकी कारणे काय ?

१) मुंबई महानगरपालिकेने १८ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर कामाशिवाय फिरणे, विनामास्क प्रवास, लग्न समारंभ, क्लब, हॉटेल, बार ,रेस्टॉरंट, सार्वजनिक सभांवर निर्बंध आणले.

- Advertisement -

२) पाचपेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या इमारती सील केल्या.

३) ५० पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी असल्यास पालिकेने कारवाई सुरु केली.

- Advertisement -

४) लोकल ट्रेन, बसमध्ये फक्त अत्यावश्यक सेवातील लोकांना परवानगी दिली.

५) दरम्यान सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या मुंबईत लसीकरणही सर्वाधिक झाले. मुंबई पालिका क्षेत्रात आत्तापर्यंत २२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली असल्याचे आकडेवारी सांगते.

७) दरम्यान मुंबईतील सर्व तांत्रिक अडचणी दूर करत दिवसाला १ लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे पालिकेने लक्ष ठेवले.

८) लसीचा तुटवडा जाणवला तरी वेळोवेळी केंद्राकडून लसीची मागणी केली जात आहे.

९ ) मुंबईत जशीजशी रूग्ण संख्या वाढत गेली. तसे खासगी हॉस्पिटलमधले बेड महापालिकेने ताब्यात घेण्यात आले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पालिकेने २११६९ खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतले.

१०) मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज औषधसाठा, इंजेक्शनस्, उपलब्ध बेड, ऑक्सिजन याचा आढावा घेतला जातो. त्यामुळे ऑक्सिजन आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहे.

तसेच मुंबईत गेल्या काही दिवसात टेस्टचं प्रमाण कमी झालंय. रुग्णसंख्या कमी दिसण्याचं हे देखील एक कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतले जात आहे.

मुंबईतील एप्रिल महिन्यातील आकडेवारी

४ एप्रिल  ११, १६३
७ एप्रिल  १०,४२८
९ एप्रिल  ९,२००
११ एप्रिल  ९,०००
१३ एप्रिल  ७,८९८
१९ एप्रिल  ७,३८१
२३ एप्रिल  ७२२१
२५ एप्रिल  ५,५४२
२६ एप्रिल  ३,८४०

पुण्यातील कोरोनाची सध्यपरिस्थिती

दरम्यान पुण्यातही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जवळपास ८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती, १८ एप्रिलदरम्यान जवळपास ६ हजार ४३४ रुग्ण आढळले होते. यात २७ एप्रिलपर्यंत पुण्यातील आकडेवारीत निम्मी घट झाली असून सध्या पुण्यात ३ हजारच्या आसपास रुग्ण एका दिवसात आढळत आहे. दरम्यान एप्रिलच्या सुरुवातीला वाढणाऱ्या आकडेवारीमुळे सर्वप्रथम पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यात राज्य सरकारनेही कडक लॉकडाऊनची घोषणा केल्याने पुणेकरांना अनावश्यक कामासाठी बाहेर पडण्यास कोणताही मुभा नव्हती. यामुळे पुण्यात गेल्या सहा दिवसांपासून नवी रुग्णसंख्या कोरोनामुक्त नागरिकांपेक्षा कमी असल्याचे पालिकेने जाहीर केले. त्यामुळे पुण्यात लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांना मोठे यश मिळत असल्याचे पुणे महापौरांनी जाहीर केले.

पुण्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची नेमकी कारणे ?

१) सर्वप्रथम पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनमुळे पुण्यातील हॉटेल, पीएमपीएमएल बससेवा, शैक्षणिक संस्था, बागा, धार्मिक स्थळे, बाजार, मॉल, सर्व सार्वजनिक कार्यक्रम, अनावश्यक दुकाने बंद ठेवण्यात आली.

२) दरम्यान १२ एप्रिलला मिनी लॉकडाऊन संपल्यानंतर पुणे प्रशासनाने या लॉकडाऊनचा कालावधी वाढवला.

३) तसेच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: जातीने लक्ष घालून वेळोवेळी बैठका घेत कोरोनाचा आढावा घेत होते.

४) सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध जाहीर झाले.

५) होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात आली.

६) शहरातील रस्त्यांवर पेट्रोलिंग, चेक पोस्टवर कडक चेकिंग सुरु आहे.

७) परिणामी निर्बंधांमुळे सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले.

८) लोकांना बेड्स आणि ऑक्सिजन सहजतेने मिळेल तेव्हा संसर्ग नियंत्रणात आला आहे,

त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबई-पुणे या शहरांमधील कोरोनाच्या बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून संसर्ग होणारी संख्या खालावली आहे. यामुळे एक आशादायक चित्र निर्माण झाले असून आत्ताच याबाबत अनुमान लावणे घाईचे होईल.

पुण्यातील एप्रिल महिन्यातील आकडेवारी

१८ एप्रिल  ६४३४
१९ एप्रिल  ४५८७
२०एप्रिल  ५,१३८
२१ एप्रिल  ५,५२९
२२ एप्रिल  ४,५३९
23 एप्रिल  ४,४६५
24 एप्रिल  ३,९९१
25 एप्रिल  ४,६३१
26 एप्रिल  २,५३८
27 एप्रिल  ३,८७१


 

- Advertisement -