घरताज्या घडामोडीcorona Virus : नेतेच ठरताहेत सुपर स्प्रेडर

corona Virus : नेतेच ठरताहेत सुपर स्प्रेडर

Subscribe

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आमदार समीर मेघे यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे नेतेच सुपरस्प्रेडर आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून लग्नसराई वाढली आहे. त्यातही नेत्यांच्या मुला, मुलींच्या लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्री जयंत पाटील, निरज गुंडे, रविंद्र फाटक, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचे लग्न झाले, तर हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचेही लग्न झाले.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु तिसरी लाट ही महाराष्ट्रातील मंत्र्यांपासूनच सुरु झाली असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण कोणाला झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. परंतु राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मागील ७ दिवसांमध्ये ७ ते ८ बड्या राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याबाबतची माहिती या नेत्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील, निरज गुंडे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचे लग्न झाले, तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचेही लग्न झाले. या लग्न सोहळ्यांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच लग्न कार्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे नेत्यांच्या मुलांचे लग्न कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

- Advertisement -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण 

शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -