घरCORONA UPDATECorona Update: चिंता वाढली! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार!

Corona Update: चिंता वाढली! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार!

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार २११ नवे कोरोनाबाधित आढळले असून २९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार झाली आहे. तसेच राज्यात २४ तासांत ७ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ३९ हजार ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या राज्यात १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्राने पेरु, चिली, स्पेन, ब्रिटन यासारख्या देशांना कोरोनाबाधितांच्या संख्येत मागे टाकले आहे.

राज्यातील कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ (१९.८७टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत. तर ४० हाजर ७७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका ११०९ १११९९१ ६० ६२४७
ठाणे २३१ १२९८१ १३ २८३
ठाणेमनपा २८८ १९९३९ १३ ६९४
नवीमुंबईमनपा ३८० १६२८५ ४२७
कल्याणडोंबवलीमनपा ३०९ २१९२९ १५ ४१९
उल्हासनगरमनपा ८१ ६९२० १४३
भिवंडीनिजामपूरमनपा २४ ३७७७ २६२
मीराभाईंदरमनपा १११ ८४५२ २६७
पालघर ७९ ३३१७ ४०
१० वसईविरारमनपा २१५ ११५८७ २७७
११ रायगड ३४७ ८९११ १९८
१२ पनवेलमनपा १५० ६८३४ १५७
१३ नाशिक ९९ ३४१५ १११
१४ नाशिकमनपा ४१० ९०१३ २४८
१५ मालेगावमनपा १८ १३६४ ८८
१६ अहमदनगर १३३ २११५ ३८
१७ अहमदनगरमनपा १७४ १८३८ १५
१८ धुळे ९० १४७० ५३
१९ धुळेमनपा ५६ १३१८ ४६
२० जळगाव १५४ ७६७८ १० ४१०
२१ जळगावमनपा ३७ २३८५ ९७
२२ नंदूरबार ११ ५७३ ३०
२३ पुणे २९४ ८६९१ १० २४९
२४ पुणेमनपा १४५८ ५५०३५ ४० १३५८
२५ पिंपरीचिंचवडमनपा ८३९ १९१९० १० ३३८
२६ सोलापूर २०४ ३६२० ११ १११
२७ सोलापूरमनपा ४८ ४९२९ ३७५
२८ सातारा १४१ ३४९६ १२८
२९ कोल्हापूर ११२ ३५०४ ६७
३० कोल्हापूरमनपा ४४ ६७२ २५
३१ सांगली २९ ९०२ ३२
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ११० ९३८ २३
३३ सिंधुदुर्ग १४ ३५६
३४ रत्नागिरी ५४ १६६६ ५६
३५ औरंगाबाद १२९ ३२७० ५८
३६ औरंगाबादमनपा ४०९ १००४४ १२ ४१४
३७ जालना १७ १८६३ ७३
३८ हिंगोली १० ५३७ १२
३९ परभणी ३०४ १३
४० परभणीमनपा २३ २१६
४१ लातूर ५२ १०४७ ५४
४२ लातूरमनपा १७ ७६१ २८
४३ उस्मानाबाद ५१ ७५९ ४०
४४ बीड ३८ ६५६ १९
४५ नांदेड ८९ ७२२ २२
४६ नांदेडमनपा ७३९ ३५
४७ अकोला ७७३ ३८
४८ अकोलामनपा १६९६ ७६
४९ अमरावती २४ ३३६ १४
५० अमरावतीमनपा ८० १४९८ ४४
५१ यवतमाळ २३ ८२७ २७
५२ बुलढाणा ४० ११५६ ३२
५३ वाशिम २१ ५५७ ११
५४ नागपूर ९३ १०८७ ११
५५ नागपूरमनपा १५३ ३०६५ ५७
५६ वर्धा १३ १६८
५७ भंडारा २१७
५८ गोंदिया २५९
५९ चंद्रपूर १४ २८०
६० चंद्रपूरमनपा ११०
६१ गडचिरोली २५०
इतरराज्ये /देश ११ ३६३ ४८
एकूण ९२११ ४००६५१ २९८ १४४६३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -