घरCORONA UPDATEचाकरमान्यांची सरकारकडून लूट, ई पाससाठी मोजावे लागतायत ५ हजार - नितेश राणे

चाकरमान्यांची सरकारकडून लूट, ई पाससाठी मोजावे लागतायत ५ हजार – नितेश राणे

Subscribe

सध्या कोरोनाचे राज्यावर वाढत जाणारे संकट बघता कोकोणात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.

राज्यात कोरोनाचा वेगाने पसार होत आहे. त्यामुळे मुंबई आणि आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे मजुरांप्रमाणे कोकणातील चाकरमान्यांनी गावची वाट धरली आहे. मात्र अक जिल्ह्याच्या सीमा सील केल्यामुळे केवळ ई पास धारकालाच कोकणात प्रवेश मिळत आहे. त्यामुळे ई पास मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या सगळ्या प्रकारात एजेंट लोकांच चांगलच फावलं आहे.  ई पासच्या नावाखाली ५ हाज रूपये उकळत असल्याचा प्रकार नितेश राणे यांनी उघडकीस आणला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत सरकरावर हल्ला केला आहे.

- Advertisement -

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या कोकणातील जनतेने शिवसेनेला सगळेच दिले. आता त्याच सरकारकडून नागरिकांची लूट केली जात आहे. कोकणात जाण्यासाठी ई पास जो तीन तासंनी मिळतो. त्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपये मोजावी लागत आहे. यांना कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे याची चौकशी झाली पाहिजे,स्वतःच्या हिंमतीवर हे नाही करू शकत! असे नितेश राणे यांनी ट्विटध्ये म्हटले आहे.

सध्या कोरोनाचे राज्यावर वाढत जाणारे संकट बघता कोकोणात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सिंधदूर्ग आणि रत्नागिरी आदी जिल्हांमधील प्रशासनावर ताण येऊ लागला आहे. मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांनीमुळे  कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – बायकोला मारण्याचा पहिला प्रयत्न फसला, तर दुसऱ्यांदा केलं असं काही की….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -