Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoronaVirus: 'या' खासगी बँकांच्या वेळेमध्ये बदल

CoronaVirus: ‘या’ खासगी बँकांच्या वेळेमध्ये बदल

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी या दोन बँकांनी वेळेत बदल केला आहे. तसंच ग्राहकांना डिजिडल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे.

Related Story

- Advertisement -

करोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तसंच रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आला. मात्र राज्यातील लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, दूध, औषधे, किराणा माल, इतर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालू राहतील. तसंच वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. पण करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता खासगी बँकांनी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वेळा कमी केल्या आहेत. यामध्ये आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी या दोन बँकांनी आपल्या कामाच्या वेळेत बदल केला आहे.

पासबुक अपडेट करण्याची सेवा बंद

पुढील काही दिवसांसाठी या दोन बँकांनी १० ते २ या वेळेतच सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत १० ते २ या वेळेत या बँका सुरू राहणार आहेत. याशिवाय पासबुक अपडेट करण्याची सेवा देखील तात्पुरती बंद करण्यात आली असून परकीय चलनाचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तसंच ग्राहकांनी चेकसाठी ड्रॉप बॉक्सचा वापर करावा, असं आवाहन एचडीएफसी बँकेने केलं आहे.

डिजिटल बँकिंगचा वापर करा 

- Advertisement -

बँकांनी ग्राहकांना गर्दी करण्यापेक्षा डिजिटल बँकिंगचा वापर करा असं देखील आवाहन केलं आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना कार्यलयात वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे. त्यातच आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकांनी वेळेत बदल केला आहे.


हेही वाचा – Coronavirus – WHO ने दिली भारताला शाबासकी! कारण…


- Advertisement -

 

- Advertisement -