Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भयंकर! महाराष्ट्रातील 'या' शहरात घरोघरी कोरोनाचे रुग्ण

भयंकर! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात घरोघरी कोरोनाचे रुग्ण

Related Story

- Advertisement -

अमरावतीमध्ये गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाची परिस्थिती खूप भितीदायक आहे. अमरावतीमधील अचलपुर तालुक्यात प्रत्येक घरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्याने आता होम आयसोलेशन देखील आता बंद करण्यात आलं आहे. अमरावतीमधील परतवाडा आणि अचलपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढल्याने आता प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

अमरावतीमध्ये सध्या कोरोनाची गंभीर स्थिती आहे. अमरावतीमधील परतवाडा आणि अचलपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये घरोघरी कोरोनाचे रुग्ण आहेत. अचलपूरमध्ये तर कोरोनाचे रुग्ण उपचारादरम्यान पळून गेले होते. दरम्यान, १७ फेब्रुवारीपर्यंत ८० घरांमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. संशयित रुग्णांना वेगळं ठेवण्याऐवजी सर्वजण घरात एकत्र राहत होते. त्यामुळे घरातील ज्या सदस्यांना कोरोनाची लागण झालेली नाही ते देखील संशयित रुग्णांच्या संपर्कात आले. त्यानंतर हेच सदस्य बाजार, दुकान, मेडीकल आदी ठिकाणी जाऊन खरेदी करू लागल्याने संपर्कातील अनेक बाधित होत गेले. त्यामुळे मोठ्या प्रणात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येताच होम आयसोलेशन बंद करण्यात आलं.

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यात २१ दिवसांत ७५४५ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. २१ दिवसांत कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२,०३,६६९ नमुण्यांची तपासणी करण्यात आली असून २७,९०१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.


हेही वाचा – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजपचं ‘जेल भरो’ आंदोलन स्थगित


- Advertisement -

 

- Advertisement -