Coronavirus Update: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७० हजारांवर

Coronavirus Update Maharashtra 1 June
महाराष्ट्राची आकडेवारी

राज्यात सोमवारी २३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. तसेच ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या  २३६२ वर पोहोचली आहे. सोमवारी ७७९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ३० हजार १०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत .