Corona Update: राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ६६१ जणांना मिळाला डिस्चार्ज

राज्यात आज ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ७७ हजार ४५३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दोन दिवसापासून राज्यातून दिलासादायक माहिती समोर येत असून कालदेखील ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा आकडा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज राज्यात ४ हजार ८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८,४८,०२६ नमुन्याांपैकी १,४७,७४१ (१७.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहते.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

हेही वाचा –

खुशखबर! TRAI ने सादर केलं अ‍ॅप; आता ग्राहक निवडू शकणार आपल्या आवडीचे चॅनल