घरCORONA UPDATEधक्कादायक! अनेकांना 'कम्युनिटी ट्रान्समिशन'द्वारे कोरोना

धक्कादायक! अनेकांना ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’द्वारे कोरोना

Subscribe

राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनाचा शिरकाव झाला असल्याच्या काही घटनासमोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यात आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. विशेषत: भारतात आता कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी हळूहळू वाढू लागली आहे. तर राज्यात आणि मुंबईची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे असतानाच आता महाराष्ट्र आणि मुंबईची चिंता वाढवणारी काही प्रकरणे हळूहळू समोर येऊ लागली आहे. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनाचा शिरकाव झाला नसल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, आता या दाव्याला छेद देणाऱ्या घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. या घटनांतून कोरोनाने धोकादायक ठरणाऱ्या कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये चंचुप्रवेश केला असल्याचे दिसत आहे, असे तज्ज्ञांने महटले आहे.

परदेशात न जाताही झाला कोरोना

महाराष्ट्रात २० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. जो परदेशात गेलेला नव्हत. मात्र, तो कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर हा रुग्ण पुण्यातील ४१ अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात आला. त्यानंतर राज्यात असे आठ रुग्ण आढळून आल्याचे राज्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. मात्र, कम्युनिटी ट्रान्समिशनपर्यंत कोरोना पोहोचलेला नाही, असा दावा सरकारकडून केला जात आहे. पण, समोर आलेल्या काही प्रकरणांनी धोक्याची सूचना दिली आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

- Advertisement -

डॉक्टराला झाली होती कोरोना लागण

तर मुंबईतीलच एका ५३ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. २७ मार्च रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये हे निष्पन्न झाले. या डॉक्टरने परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आता या डॉक्टरकडे गेल्या काही दिवसात तपासणीसाठी आलेल्या त्या रुग्णाचा शोध घेत आहेत.

घरातून बाहेर न पडताही झाला कोरोना

कांदिवली परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकाच्या ४० वर्षीय पत्नीला कोरोनाची लागण झाली. या महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान, मृत्यू झाला. तसेच मुंबई महापालिकेकडून या महिलेला नेमकी कोरोनाची लागण कशी झाली? याचा शोध घेतला जात आहे. कारण ही महिला मागील काही दिवसांपासून घरातून बाहेर देखील पडली नव्हती.

- Advertisement -

महापालिकेचे अधिकारी घेत आहेत शोध

त्यानंतर प्रभादेवी परिसरातील एका चाळीत राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. या महिलेवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर तीन दिवसांनी या महिलेचा मृत्यू झाला होतो. तसेच या महिलेला कशामुळे कोरोनाची लागण झाली, याचा शोध महापालिकेचे अधिकारी घेत आहे.

तर दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका ६४ वर्षीय व्यक्तीची कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर या व्यक्तीचा २१ दिवसांनी मृत्यू झाला. हा व्यक्ती सुरतहून ट्रेनने परत आला होता. मात्र, या व्यक्तींना बाहेरचा प्रवास केला नव्हता. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात ते आले नव्हते, असे त्यांच्या कुटुंबियाने सांगितले आहे.

दरम्यान, या घटनासंदर्भात बोलताना धीरूभाई अंबानी रुग्णालयात कार्यरत असलेले सांसर्गिक आजारांचे तज्ज्ञ डॉ. तनू सिंघल म्हणाल्या, ‘ही तुरळक प्रकरणे म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशन आहे. जोपर्यंत रिर्पोट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी आहे. तोपर्यंत हे चिंताजनक नाही,’ असे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन कुठेही दिसून आलेले नाही. जर कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे संसर्ग झाला तर ग्रामीण भागात प्रचंड रुग्ण वाढतील. मात्र, तसे अद्यापपर्यंत झालेले नाही,’.  – डॉ. प्रदीप आवटे; राज्याचे साथरोग तज्ज्ञ


हेही वाचा – Corona Live Update: जामखेडमधील ३ व्यक्तींना कोरोनाची लागण, एकूण ८ बाधीत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -