घरमहाराष्ट्रराज्यात करोनाचे १५७६ नवे रुग्ण ४९ जणांचा मृत्यू

राज्यात करोनाचे १५७६ नवे रुग्ण ४९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात शुक्रवारी १५७६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने करोना बाधितांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १०६८ वर पोहचली आहे. शुक्रवारी ५०५ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ६५६४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात ४९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये मुंबईमधील ३४, पुण्यात ६, अकोला २, कल्याण डोंबिवली २, धुळ्यात २, पनवेल १, जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २९ पुरुष तर २० महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ पोर्टलनुसार राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग ११ दिवस इतका आहे.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,५०,४३६ नमुन्यांपैकी २,२१,३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९,१०० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

मुंबईत ९३३ नवे रुग्ण ३४ जणांचा मृत्यू
मुंबईत करोनाबाबत कोणताही दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी मुंबईत ९९८ नवे रुग्ण सापडलेले असतानाच त्यात शुक्रवारी आणखी ९३३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १७ हजार ५१२ वर गेली आहे. तर शुक्रवारी ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील करोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या ६५५ वर पोहचली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज ६५० संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती केले आहे. तर करोनाच्या संशयावरून भरती करण्यात आलेल्या २३१ रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज मुंबईत एकूण ९३३ नवे करोना रुग्ण सापडले असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १७५१२ झाली आहे. तर आज ३३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -