घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक ९७ मृत्यू; २०९१ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक ९७ मृत्यू; २०९१ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गहिरं होत असल्याचं दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकाच दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. या आकडेवारीमुळे आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १७९२ झाली आहे. त्यासोबतच आज राज्यात २०९१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५४ हजार ७५८ झाला आहे. या पार्श्वभूमीवर ११६८ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढून १६ हजार ९५४ झाला आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

 

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३२९७४ १०६५
ठाणे          ४८४
ठाणे मनपा २८६६ ५२
नवी मुंबई मनपा २१५४ ३२
कल्याण डोंबवली मनपा ९८९ १८
उल्हासनगर मनपा १९८
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ९९
मीरा भाईंदर मनपा ५२५ १०
पालघर १२२
१० वसई विरार मनपा ६३० १५
११ रायगड ४७१
१२ पनवेल मनपा ३७४ १२
ठाणे मंडळ एकूण ४१८८६ १२२६
१३ नाशिक १२३
१४ नाशिक मनपा १४७
१५ मालेगाव मनपा ७२२ ४७
१६ अहमदनगर ६४
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २९
१९ धुळे मनपा १००
२० जळगाव ३२४ ३६
२१ जळगाव मनपा १२३
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १६८४ १०६
२३ पुणे ३८३
२४ पुणे मनपा ५६०२ २६८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३५०
२६ सोलापूर २५
२७ सोलापूर मनपा ६२१ ४७
२८ सातारा ३३९
पुणे मंडळ एकूण ७३२० ३३६
२९ कोल्हापूर ३१२
३० कोल्हापूर मनपा २८
३१ सांगली ७६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १९
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १७१
कोल्हापूर मंडळ एकूण ६१७
३५ औरंगाबाद २६
३६ औरंगाबाद मनपा १२८४ ५२
३७ जालना ७३
३८ हिंगोली १३३
३९ परभणी १९
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १५४१ ५४
४१ लातूर ७४
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ३७
४४ बीड ३२
४५ नांदेड १९
४६ नांदेड मनपा ८६
लातूर मंडळ एकूण २५६
४७ अकोला ३९
४८ अकोला मनपा ३९८ १५
४९ अमरावती १६
५० अमरावती मनपा १७७ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ४९
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ८०२ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४७२
५६ वर्धा
५७ भंडारा १४
५८ गोंदिया ४७
५९ चंद्रपूर १६
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली २६
नागपूर एकूण ६००
इतर राज्ये /देश ५२ १२
एकूण ५४७५८ १७९२

 

राज्यात ९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३९, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, पुण्यात ८ , सोलापूरात ७, औरंगाबाद मध्ये ५, मीरा भाईंदरमध्ये ५, मालेगाव मध्ये ३ आणि उल्हासनगर मध्ये ३, तर नागपूर शहर १ आणि रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६३ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ९७ रुग्णांपैकी ६५ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७९२ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -