घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २३४५ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६४ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २३४५ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६४ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज २ हजाराहून जास्त नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. आजही तीच परिस्थिती राज्यात दिसून आली असून गेल्या २४ तासांत राज्यात २३४५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४१ हजार ६४२ झाला आहे. याशिवाय, गेल्या २४ तासांत राज्यात ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता १४५४ पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात १४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ११ हजार ७२६ झाला आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २५५०० ८८२
ठाणे          ३३८
ठाणे मनपा २०४८ ३३
नवी मुंबई मनपा १६६८ २९
कल्याण डोंबवली मनपा ६४१
उल्हासनगर मनपा १३१
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८०
मीरा भाईंदर मनपा ३६२
पालघर १०२
१० वसई विरार मनपा ४२५ ११
११ रायगड २८५
१२ पनवेल मनपा २७१ ११
  ठाणे मंडळ एकूण ३१८५१ ९९३
१३ नाशिक ११३
१४ नाशिक मनपा ८४
१५ मालेगाव मनपा ७१० ४३
१६ अहमदनगर ४७
१७ अहमदनगर मनपा १९
१८ धुळे १५
१९ धुळे मनपा ८०
२० जळगाव २५२ २९
२१ जळगाव मनपा ७९
२२ नंदूरबार २६
  नाशिक मंडळ एकूण १४२५ ९४
२३ पुणे २५५
२४ पुणे मनपा ४२०७ २२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०३
२६ सोलापूर १०
२७ सोलापूर मनपा ५१२ २७
२८ सातारा १८४
  पुणे मंडळ एकूण ५३७१ २६४
२९ कोल्हापूर १४१
३० कोल्हापूर मनपा २०
३१ सांगली ५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १२३
  कोल्हापूर मंडळ एकूण ३५७
३५ औरंगाबाद २०
३६ औरंगाबाद मनपा ११०६ ३९
३७ जालना ४३
३८ हिंगोली ११०
३९ परभणी १५
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १२९७ ४०
४१ लातूर ५१
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद १९
४४ बीड १३
४५ नांदेड ११
४६ नांदेड मनपा ८१
  लातूर मंडळ एकूण १७८
४७ अकोला २९
४८ अकोला मनपा ३१५ १५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा १३१ १२
५१ यवतमाळ १११
५२ बुलढाणा ३८
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ६४१ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४३४
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ४७४
  इतर राज्ये /देश ४८ ११
  एकूण ४१६४२ १४५४

 

- Advertisement -

राज्यात गुरुवारी ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबई ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,१९,७१० नमुन्यांपैकी २,७८,०६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१,६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,८९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६४.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,३७,३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६,८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -