घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २७०१ कोरोना रुग्णांची नोंद; तर ८१ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २७०१ कोरोना रुग्णांची नोंद; तर ८१ जणांचा मृत्यू

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्षेपांनंतर राज्यातल्या कोरोना मृतांमध्ये आज १३२८ अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पुन्हा नव्याने रुग्ण सापडल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. आज दिवसभरात राज्यात २७०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आणि कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १ लाख १३ हजार ४४५ इतका झाला आहे. याशिवाय, ८१ कोरोना रुग्णांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजचे ८१ आणि याआधीचे समाविष्ट करण्यात आलेले १३२८ अशा एकूण १४०९ मृत्यूंची आज नव्याने भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला असून ५ हजार ५३७ इतका झाला आहे. यासोबतच राज्यात आज दिवसभरात १८०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा देखील ५७ हजार ८५१वर पोहोचला आहे. राज्यात सद्यघडीला एकूण ५० हजार ०४४ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
१५ जून पर्यंत आजचे १६ जून पर्यंत एकूण पूर्वीचे एकूण
मुंबई महानगरपालिका ६०२२८ २२५० ५५ २३०५ ८६२ ३१६७
ठाणे २००२ ३२ ३२ ४१
ठाणे मनपा ६३३० १६७ १६७ ४६ २१३
नवी मुंबई मनपा ४८९२ ११६ ११६ ३५ १५१
कल्याण डोंबवली मनपा २९१३ ५६ ५८ १९ ७७
उल्हासनगर मनपा ८१५ २९ २९ ३७
भिवंडी निजामपूर मनपा ६८९ १२ १४ १० २४
मीरा भाईंदर मनपा १६८७ ६८ ११ ७९ १९ ९८
पालघर ४५५ १६
१० वसई विरार मनपा २१३८ ६३ ६३ ६६
११ रायगड ९२४ ३० ३० ३४
१२ पनवेल मनपा १०४८ ४२ ४२ १० ५२
ठाणे मंडळ एकूण ८४१२१ २८७३ ७० २९४३ १०३३ ३९७६
१३ नाशिक ३६५ १० १२ २०
१४ नाशिक मनपा ८२९ २६ २८ ३७
१५ मालेगाव मनपा ९०७ ६८ ६५ ११ ७६
१६ अहमदनगर १८७ १० ११
१७ अहमदनगर मनपा ६१
१८ धुळे १९४ २० २० २६
१९ धुळे मनपा २५४ १९ १९ २५
२० जळगाव १४७६ ११७ ११७ २५ १४२
२१ जळगाव मनपा ४०५ १८ १७ २६
२२ नंदूरबार ७२  ०
नाशिक मंडळ एकूण ४७५० २९१ २९३ ७५ ३६८
२३ पुणे ९१७ १९ २० १० ३०
२४ पुणे मनपा १०८७६ ४५० ४५७ ७० ५२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०९५ २५ २६ ३१
२६ सोलापूर १५४ ४५ ५३
२७ सोलापूर मनपा १८०१ १२५ १२५ १३१
२८ सातारा ७६० २८ २८ ३४
पुणे मंडळ एकूण १५६०३ ६५५ ६६४ १४२ ८०६
२९ कोल्हापूर ६३३
३० कोल्हापूर मनपा १००  ०
३१ सांगली २४१ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४
३३ सिंधुदुर्ग १५६
३४ रत्नागिरी ४४५ १७ १७ १८
कोल्हापूर मंडळ एकूण १५८९ ३२ ३२ ४०
३५ औरंगाबाद २०८ ३० ३२
३६ औरंगाबाद मनपा २६४९ १३३ १३३ १३६
३७ जालना २९५ १२
३८ हिंगोली २४२
३९ परभणी ५५
४० परभणी मनपा २७
औरंगाबाद मंडळ एकूण ३४७६ १४७ १४७ ३८ १८५
४१ लातूर १३८
४२ लातूर मनपा ५०
४३ उस्मानाबाद १५१
४४ बीड ७७  ०
४५ नांदेड ४३
४६ नांदेड मनपा १९८ १०
लातूर मंडळ एकूण ६५७ २५ २५ ३३
४७ अकोला ९९ १० १६
४८ अकोला मनपा ९५१ ३६ ३६ ४०
४९ अमरावती ३२
५० अमरावती मनपा ३३३ १९ १९ २५
५१ यवतमाळ १९०
५२ बुलढाणा १३८
५३ वाशिम ५३
अकोला मंडळ एकूण १७९६ ७१ ७१ २४ ९५
५४ नागपूर ९९
५५ नागपूर मनपा १०११ १२ १२ १२
५६ वर्धा १४
५७ भंडारा ५१
५८ गोंदिया ८५
५९ चंद्रपूर ३१
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ४९
नागपूर एकूण १३६० १४ १४ १४
इतर राज्ये /देश ९३ २० २० २०
एकूण ११३४४५ ४१२८ ८१ ४२०९ १३२८ ५५३७

 

- Advertisement -

आज राज्यात ८१ कोविड १९ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -