घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू; तर २७३९ नवे रुग्ण

Coronavirus Update: आज राज्यात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू; तर २७३९ नवे रुग्ण

Subscribe

राज्यावरचं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. एकीकडे राज्य सरकारनं मिशन बिगीन अगेन सुरू केलेलं असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्या मात्र वाढतच असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात १२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा २९६९ झाला आहे. याशिवाय राज्यात आज २७३९ नव्या रुग्णांचं निदान झालं असून एकूण रुग्णांचा आकडा ८२ हजार ९५८ इतका झाला आहे. यातले ३७ हजार ३९० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आज घडीला ४२ हजार ६०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी :

- Advertisement -

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ४७३५४ १५७७
ठाणे         १०६५ २१
ठाणे मनपा ४७१० १२०
नवी मुंबई मनपा ३३५७ ८६
कल्याण डोंबवली मनपा १६९८ ३४
उल्हासनगर मनपा ४८५ १५
भिवंडी निजामपूर मनपा २४७ ११
मीरा भाईंदर मनपा ९०२ ३५
पालघर १९२
१० वसई विरार मनपा ११९४ ३४
११ रायगड ७२२ २९
१२ पनवेल मनपा ६८९ २६
ठाणे मंडळ एकूण ६२६१५ १९९३
१३ नाशिक २१७
१४ नाशिक मनपा ४१३ १८
१५ मालेगाव मनपा ७८२ ६८
१६ अहमदनगर १४१
१७ अहमदनगर मनपा ४९
१८ धुळे ७९ ११
१९ धुळे मनपा १५२ १०
२० जळगाव ७२३ ९६
२१ जळगाव मनपा २४० १३
२२ नंदूरबार ४०
नाशिक मंडळ एकूण २८३६ २३०
२३ पुणे ६२३ १५
२४ पुणे मनपा ८०४९ ३७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६१७ १३
२६ सोलापूर ८५
२७ सोलापूर मनपा ११७६ ९०
२८ सातारा ६२६ २७
पुणे मंडळ एकूण १११७६ ५२३
२९ कोल्हापूर ६१३
३० कोल्हापूर मनपा २५
३१ सांगली १३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३
३३ सिंधुदुर्ग ११३
३४ रत्नागिरी ३५२ १०
कोल्हापूर मंडळ एकूण १२४८ २०
३५ औरंगाबाद ४६
३६ औरंगाबाद मनपा १८१५ ९०
३७ जालना १७७
३८ हिंगोली २०६
३९ परभणी ५३
४० परभणी मनपा २५
औरंगाबाद मंडळ एकूण २३२२ ९८
४१ लातूर १०५
४२ लातूर मनपा ३०
४३ उस्मानाबाद ११८
४४ बीड ५३
४५ नांदेड ३२
४६ नांदेड मनपा १३६
लातूर मंडळ एकूण ४७४ १५
४७ अकोला ५०
४८ अकोला मनपा ७१२ २९
४९ अमरावती २०
५० अमरावती मनपा २६९ १६
५१ यवतमाळ १६०
५२ बुलढाणा ८६
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण १३०६ ६०
५४ नागपूर ४८
५५ नागपूर मनपा ६९० ११
५६ वर्धा
५७ भंडारा ३९
५८ गोंदिया ६८
५९ चंद्रपूर १८
६० चंद्रपूर मनपा १३
६१ गडचिरोली ४१
नागपूर एकूण ९२६ १२
इतर राज्ये /देश ६५ १८
एकूण ८२९६८ २९६९

 

- Advertisement -

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ५७.५ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३,ठाणे -९, उल्हासनगर -६,नवी मुंबई -६, सातारा- २,  वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१ , सोलापूर १असे मृत्यू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -