घरCORONA UPDATECoronavirus Update: राज्यात ३३०७ नवे रुग्ण; ११४ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: राज्यात ३३०७ नवे रुग्ण; ११४ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात बुधवारी ३३०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,१६,७५२ झाली. यामध्ये ५१,९२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५६५१ झाली आहे. आज १३१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत ५९,१६६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.६८ % एवढे आहे.

राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. मुंबई ७७, मीरा भाईंदर १, जळगाव ७, नंदूरबार २, मालेगाव २, पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १, लातूर २, यवतमाळ १ असे मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये ( ७३.७ % ) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७,००,९५४ नमुन्यांपैकी १, १६,७५२ ( १६.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.६८ % एवढे आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात ५,८२,६९९ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८०,५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७,५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -