घरताज्या घडामोडीCoronavirus Update: आज राज्यात ३७२१ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६२ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात ३७२१ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६२ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज तब्बल ३ हजार ७२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३५ हजार ७९६ वर गेला आहे.

राज्यात आज तब्बल ३ हजार ७२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३५ हजार ७९६ वर गेला आहे. यापैकी ६१ हजार ७९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६७ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी आज दिवसभरात राज्यात ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ६ हजार २८३ च्या घरात पोहोचला आहे. तर राज्यातील मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे.

१ हजार ९६२ रुग्ण झाले बरे

राज्यात नोंदविलेल्या ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत आणि ५१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ४६, वसई विरार २, रायगड २ व कल्याण डोंबिवली १ यांचा समावेश आहे. हे ५१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आज १ हजार ९६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६७ हजार ७०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.८६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ (१७.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १ हजार १८२ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २६,९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -