घरCORONA UPDATECoronavirus Update: राज्यात आज ५९७ कोरोनाबाधित नवे रुग्ण, तर ३२ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Update: राज्यात आज ५९७ कोरोनाबाधित नवे रुग्ण, तर ३२ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ९९१५ झाली आहे. तर आज ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत. या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १मृत्यू झाला आहे.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -