घरCORONA UPDATECoronavirus: राज्यात नवीन ८११ कोरोनाबाधित रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ७६२८

Coronavirus: राज्यात नवीन ८११ कोरोनाबाधित रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ७६२८

Subscribe

राज्यात ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १०७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी मुंबईतील १३, पुणे ४, मालेगाव १, पुणे ग्रामीण 1, पिंपरी चिंचवड 1, धुळे १, तर सोलापूर शहरात एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या २२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ११ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २२ मृत्यूंपैकी १३ रुग्णांमध्ये (५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२३ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,०८,९७२ नमुन्यांपैकी १,०१,१६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७६२८. जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ५५५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८१९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३१.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,२५,३९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,१२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

- Advertisement -

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र | जिल्हा | महानगरपालिका बाधित रुग्ण | मृत्यू

१ मुंबई महानगरपालिका | ५०४९ | १९१
२ ठाणे ७१७ १५
३ पालघर १३९ ४
४ रायगड ५६ १
मुंबई मंडळ एकूण – ५९६१ | २११

- Advertisement -

५ नाशिक १३१ १२
६ अहमदनगर ३५ २
७ धुळे २५ ३
८ जळगाव १३ २
९ नंदूरबार ११ १
नाशिक मंडळ एकूण २१५ २०
१० पुणे १०३० ७३
११ सोलापूर ४६ ४
१२ सातारा २९ २
पुणे मंडळ एकूण ११०५ ७९
१३ कोल्हापूर १० ०
१४ सांगली २६ १
१५ सिंधुदुर्ग १ ०
१६ रत्नागिरी ८ १
कोल्हापूर मंडळ एकूण ४५ २
१७ औरंगाबाद ५० ५
१८ जालना २ ०
१९ हिंगोली ८ ०
२० परभणी १ ०
औरंगाबाद मंडळ एकूण ६१ ५
२१ लातूर ९ ०
२२ उस्मानाबाद ३ ०
२३ बीड १ ०
२४ नांदेड १ ०
लातूर मंडळ एकूण १४ ०
२५ अकोला २३ १
२६ अमरावती १९ १
२७ यवतमाळ २८ ०
२८ बुलढाणा २१ १
२९ वाशिम १ ०
अकोला मंडळ एकूण ९२ ३
३० नागपूर १०७ १
३१ वर्धा ० ०
३२ भंडारा ० ०
३३ गोंदिया १ ०
३४ चंद्रपूर २ ०
३५ गडचिरोली ० ०
नागपूर एकूण ११० १
इतर राज्ये २५ २

एकूण – ७६२८ | ३२३ 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -