घरCORONA UPDATECoronavirus Update: राज्यात आज ३००७ नवे रुग्ण आढळले; ९१ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: राज्यात आज ३००७ नवे रुग्ण आढळले; ९१ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज राज्यात ३००७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ९७५ वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा ३ हजार ६० झाला आहे. तसेच आज राज्यात १ हजार ९२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३९ हजार ३१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राने कोरोनाबाधितांच्या आकड्यात चीनला मागे टाकले आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. तसेच नोंद झालेल्या ९१ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरी ४६ रुग्ण आहेत. तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये ७३.६ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ४८७७४ १६३८
ठाणे ११६७ २१
ठाणे मनपा ४८६१ १२०
नवी मुंबई मनपा ३४८४ ८६
कल्याण डोंबवली मनपा १८१२ ३४
उल्हासनगर मनपा ४९९ २०
भिवंडी निजामपूर मनपा २६६ ११
मीरा भाईंदर मनपा ९२५ ३९
पालघर २१०
१० वसई विरार मनपा १२७५ ३४
११ रायगड ७४० २९
१२ पनवेल मनपा ७०१ २६
१३ नाशिक २४८
१४ नाशिक मनपा ४३९ १९
१५ मालेगाव मनपा ८३४ ६८
१६ अहमदनगर १५१
१७ अहमदनगर मनपा ५२
१८ धुळे ८२ ११
१९ धुळे मनपा १५६ १०
२० जळगाव ७८७ ९६
२१ जळगाव मनपा २६२ १३
२२ नंदूरबार ४०
२३ पुणे ६५५ १५
२४ पुणे मनपा ८३८८ ३७७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६६२ १४
२६ सोलापूर ८८
२७ सोलापूर मनपा १२५५ ९८
२८ सातारा ६३० २७
२९ कोल्हापूर ६२२
३० कोल्हापूर मनपा २५
३१ सांगली १३७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३
३३ सिंधुदुर्ग ११३
३४ रत्नागिरी ३५४ १०
३५ औरंगाबाद ४७
३६ औरंगाबाद मनपा १९१८ ९०
३७ जालना १८८
३८ हिंगोली २१३
३९ परभणी ५३
४० परभणी मनपा २५
४१ लातूर १०६
४२ लातूर मनपा ३१
४३ उस्मानाबाद १२४
४४ बीड ५५
४५ नांदेड ३२
४६ नांदेड मनपा १३७
४७ अकोला ५०
४८ अकोला मनपा ७२८ ३०
४९ अमरावती २१
५० अमरावती मनपा २७२ १६
५१ यवतमाळ १६०
५२ बुलढाणा ८७
५३ वाशिम १०
५४ नागपूर ५०
५५ नागपूर मनपा ६९७ ११
५६ वर्धा ११
५७ भंडारा ३९
५८ गोंदिया ६८
५९ चंद्रपूर १९
६० चंद्रपूर मनपा १३
६१ गडचिरोली ४२
  इतर राज्ये /देश ७२ १९
  एकूण ८५९७५ ३०६०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -